pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवावी

0 4 0 4 6 0
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.07

राजपत्रानूसार दि.1 एप्रिल 2019 पासुन उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतुद करण्यात आलेली आहे. तसेच केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 अन्वये महाराष्ट्र शासनाने सर्व वाहनांना एचएसआरपी बसविण्याची तरतुद केली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
जालना जिल्ह्यासाठी एफटीए एचएसआरपी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही एजन्सी निश्चित करण्यात आली असून एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी बुकींग पोर्टल https://maharashtrahsrp.com हे निश्चित करण्यात आलेले आहे. वाहनधारकांनी पोर्टलवर बुकींग करुन सोईप्रमाणे अपॉईंटमेंट घेवून एचएसआरपी बसवून घेण्यात यावी. एचएसआरपी नंबर प्लेटसाठी दुचाकी व ट्रॅक्टरसाठी 450 रुपये, तीन चाकीसाठी 500 रुपये आणि इतर सर्व वाहनांसाठी 745 रुपये शुल्क जीएसटी वगळुन आकारण्यात येईल. कामानिमित्त जालना जिल्ह्यात वाहन वापरत असल्यास देखील एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे. एचएसआरपी नंबर प्लेटबाबत काही तक्रार असल्यास पोर्टलवर तसेच जालना उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात दाखल करावी. एचएसआरपी नंबर प्लेट नसलेली वाहने, बनावट एचएसआरपी नंबर प्लेट असलेल्या वाहनावर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 4 6 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे