pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

27 मे रोजी जिल्हा क्रीडा संकुल, जालना अंतर्गत क्रीडा सुविधांच्या कामाचे भुमिपुजन

0 4 0 5 0 5
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.25

क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अधिनस्त़ क्रीडा व युवक सेवा, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल, जालना अंतर्गत टप्पा (फेज ) 1 मधील पुढील प्रमाणे विविध विकसीत करावयाच्या टेनिस कोर्ट-1, सिंथेटिक बॉस्केटबॉल कोर्ट -1, व्हॉलीबॉल मैदान- 1,कबड्डी मैदान – 2, खो-खो मैदान – 2, सिंथेटिंक स्केटींग रिंग -1, आर्टीफिशियल क्रिकेट टर्फ -1, रिफरबीशमेंट ऑफ एक्झीस्टींग जिम हॉल -1, संरक्षक भिंत, अंतर्गत रस्ते इत्यादी कामांचा अंदाजे रक्कम 2 कोटी 91 लक्ष 45 हजार 681 रूपये भुमिपुजन कार्यक्रम सोहळा, रेल्वे, कोळसा व खाणकाम, राज्यमंत्री रावसाहेबजी पाटील दानवे, यांच्या अध्यक्षतेखाली व, सहकार, इतर मागास बहुजन कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जालना जिल्हा अतुलजी सावे, यांच्या शुभहस्ते जिल्हयातील खासदार, सर्व आमदार, आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना, पोलीस अधिक्षक, जालना, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद, जिल्हयातील सर्व एकविध जिल्हा क्रीडा संघटनाचे अध्यक्ष / सचिव, पदाधिकारी यांच्या उपस्थित दि. 27 मे 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता करण्याचे निश्चित झाले आहे.
सदर भुमिपूजन सोहळयासाठी जिल्हयातील सर्व नागरिक, प्रतिष्ठीत व्यक्ती, क्रीडा संघटक, क्रीडा शिक्षक, क्रीडा अनुदान प्राप्त सर्व संस्थेचे पदाधिकारी, सदस्य़, खेळाडू, क्रीडा प्रेमी, नागरिक, महिला यांनी या शासकीय कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा क्रीडा संकुल समिती, जालना अरविंद विद्यागर, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 5 0 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे