महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद व शासकीय
लिपिकवर्गीय-लेखा संवर्गीय कर्मचार्यांच्या वेतनश्रेणीतील त्रुटी निवारण व पदोन्नती स्तर निर्धारणासाठी गठीत महाराष्ट्र राज्य कृती समितीची
राज्यस्तरीय महत्त्वपूर्ण बैठक २८ जून रोजी जालना जिल्हा परिषदेच्या कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली.या बैठकीस मुख्य निमंत्रक बलराज मगर, समितीचे निमंत्रक अशोक डहाळे,बापूराव पुजरवाड, सागर बाबर, लेखा संघटना अध्यक्ष मिलिंद कांबळे, संतोष
जेजुरकर, शालीन माऊलीकर, राज्य कृती समितीचे सक्रिय सदस्य शरद बिरादार,आनंद भिसे,विशाल परदेशी, पंकज गुल्हाने, अरुण जोरवेकर, बापूसाहेब
कुलकर्णी, उमाकांत सूर्यवंशी, पवन तलवारे, सलीम पटेल, अशोक कासराळीकर,माधवी पुरी, तसेच लातूर जिल्हाध्यक्ष सुजित कमलापुरे,चंद्रकांत हवा,
बालाजी मुतंगे, संग्राम भिंगोले, बद्रीनाथ सुरवसे, आनंद ढगे आणि राज्यभरातील लिपिकवर्गीय कर्मचारी व महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कनिष्ठ व वरिष्ठ सहाय्यक पदनामामध्ये बदल करून ‘जिल्हा परिषद विकास अधिकारी’ हे पदनाम देण्यात यावे आणि त्यांना एस-१५ वेतनश्रेणी लागू करावी. कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सहाय्य प्रशासन अधिकारी या पदनामामध्ये
बदल करून ‘जिल्हा परिषद प्रशासन अधिकारी’ हे नवीन पदनाम देण्यात यावे व त्यांना एस-१८ वेतनश्रेणी लागू करावी. या मागण्या इंडियन यूनियनच्या
वतीने मांडण्यात आल्या आणि त्यास कृती समितीतील सर्व संघटनांनी एकमताने पाठिंबा दिला. याबाबतचा ठराव तातडीने कृती समितीच्या लेटरपॅडवर शासनाकडे
येणार्या दोन दिवसांत सादर करण्याचे ठरले. यापुढील कारवाईसाठी कृती समिती शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे, जेणेकरून लिपिकवर्गीय
कर्मचार्यांना लवकरात लवकर लाभ मिळवून देता येईल, असेही बैठकीत ठरविण्यात आले आहे.
आजपर्यंतचा इतिहास आहे लिपिक वर्गीय संघटनेच्या बाबतीत जो काही निर्णय झालेला आहे त्याची चळवळ जालना जिल्ह्यापासून सुरुवात झालेली आहे.
त्यासाठी सर्व महत्त्वाचे योगदान जालना जिल्हा परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल भेरे-पाटील व राज्य उपाध्यक्ष संजय चव्हाण यांचेही संघटनेच्या वतीने जालन्यामध्ये बैठक घेतली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व सदैव पूर्ण लिपिक
वर्गीय तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले.
या बैठकीस अमरावती जिल्ह्यातून पंकज गुल्हाने, संजय राठी, गजानन कोरडे,गिरीश कोठाळे व हेमंत येवले यांचीही प्रमुख उपस्थिती होती. बैठक यशस्वीरीत्या संपन्न झाली असून राज्यातील कर्मचारी वर्गाच्या हितासाठी
निर्णायक पावले उचलली जातील, असा विश्वास कृती समितीने व्यक्त केला.बैठकीचे नियोजन लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनाचे जालना जिल्हा अध्यक्ष
अनिल भेरे पाटील व राज्य उपाध्यक्ष संजय चव्हाण यांनी जालना जिल्ह्याच्या वतीने केले होते.