मोहपूर येथील त्रिमूर्ती इंग्लिश स्कूलमध्ये धाडसी चोरी
बांधकाम साहित्याच्या 71 हजाराच्या लोखंडी सळई लंपास

अनिल भालेकर/अंबड,दि.20
घनसावंगी तालुक्यातील मोहपुरी वडीरामसगाव येथील त्रिमूर्ती इंग्लिश स्कूल मध्ये चोरट्यांनी बांधकामाच्या साहित्यावर डल्ला मारत धाडसी चोरी केली. चोरट्यांनी 71 हजार रुपयांच्या लोखंडी सळई रातोरात लंपास केल्या.
याबाबत शाळेचे मुख्याध्यापक भानुदास डोंगरे यांनी घनसावंगी पोलीस स्टेशन येथे फिर्याद नोंदवली आहे. फिर्यादीनुसार दिनांक 19.01. 2026 रोजी सकाळी नऊ वाजता दरम्यान नेहमीप्रमाणे आमच्या शाळेमध्ये गेलो असता शाळेचे वर्ग खोल्याचे बांधकाम चालू असून मी बांधकामाची पाहणी करण्यासाठी गेलो असता बाजूलाच बांधकामाचे साहित्यपैकी काही साहित्य मला कमी वाटले म्हणून मी आमच्या शाळेच्या वाचमन सुरेश दत्तात्रय सातपुते यांना बोलावून घेतले व सदर जागेची पाहणी केली असता लोखंडी सळई दिसून आल्या नाहीत,त्या कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे आढळून आले व या लोखंडी सळ्याची एकूण किंमत 71 हजार रुपये होती.
फिर्यादीनुसार घनसावंगी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता बी एन एस 303 (2) नुसार अज्ञात चोरट्यां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल गजानन घाईत हे करत आहे.
शाळे सारख्या ठिकाणी चोरट्यांनी चोरी केल्याची घटना माहिती होताच ग्रामस्थ, पालकांमध्ये संताप व आश्चर्य व्यक्त केले जात आहे.



