सिद्धार्थ महाविद्यालयात ७७वा प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.26
जाफराबाद येथील सिद्धार्थ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ७७वा प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश देशमुख उपप्राचार्य प्रो.डॉ. सुनील मेढे उपप्राचार्य प्रा.विनोद हिवराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश देशमुख यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व सामूहिक राष्ट्रगीत गायन केले.तसेच यावेळी प्रा.अनिल वैद्य यांनी भारतीय संविधान प्रस्ताविकेचे वाचन केले तर एन.ए.एस विभाग प्रमुख डॉ.प्रदीप मिसाळ यांनी मतदान जनजागृतीच्या अनुषंगाने उपस्थितांना शपथ देण्यात आली . प्रजासत्ताक दिनासाठी महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागाचे प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



