pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

भारतीय बौध्द महासभेच्या मंठा तालुकाध्यक्षपदी संतोष सदावर्ते तर उपाध्यक्षपदी सिध्दोधन मोरे यांची निवड

0 4 0 4 2 1
[sp_wpcarousel id="1375"]
मंठा/प्रतिनिधी,दि.18
दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडीया तथा भारतीय बौध्द महासभेची मंठा तालुक्याची कार्यकारीणी जाहिर झाली असून मंठा तालुकाध्यक्ष पदी संतोष सदावर्ते तर उपाध्यक्षपदी सिध्दोधन मोरे यांची निवड करण्यात आली.
दि. 17 एप्रिल रोजी मंठा येथील शासकीय विश्रामगृहात भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद मगरे, जिल्हा महासचिव संजय हेरकर, कोष्याध्यक्ष राजकुमार दांडगे जिल्हा संघटक भास्कर घेवंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी ही कार्यकारीणी जाहिर करण्यात आली.
भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी दिलेल्या आदेशानुसार धम्मचक्र गतीमान करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दहा उद्दीष्ठावर काम करावे. असे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद मगरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सदर बैठकीस अशोक सदावर्ते, शिवाजी गायकवाड, अनिल सदावर्ते, महादेव गायकवाड, अभिजीत सदावर्ते, गुलाब सदावर्ते, अशोक खरात, संतोष सोनुने, भगवान मोरे यांची उपस्थिती होती. सदरील निवडीबद्दल जिल्हा उपाध्यक्षा माधूरी मोरे, अनुराधा हेरकर, वंदना इंगळे, किरण सोनवने, नितीन निसर्गन आदींनी अभिनंदन केले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 4 2 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे