महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025 खाजगी व्यक्तींच्या जागेवर, सार्वजनिक जागेवर झेंडे, भित्तीपत्रके लावण्यास निर्बंध

जालना/प्रतिनिधी,दि.23
राज्य निवडणूक आयोगाने दि.15 डिसेंबर 2025 ते दि.16 जानेवारी 2026 या मतमोजणीच्या दिवसापर्यंत महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2025-26 साठी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. जालना महानगरपालिकेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी किंवा त्यांचे हितचिंतक यांना निवडणूकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रक लावणे, घोषणा लिहिणे आदिसाठी कोणत्याही व्यक्तीची जागा, इमारत, आवार, भिंती इत्यादीवर संबंधीत मालकाची परवानगीशिवाय व संबंधीत परवाना प्राधिकरणाचे परवानगीशिवाय वापर करण्यास निर्बंध घालण्याची आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्ताल यांनी जारी केले आहेत.

