29 ऑक्टोबर रोजी शौर्य दिन कार्यक्रमाचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि.25
सर्व भारतीयांसाठी 29 सप्टेंबर हा दिवस अभिमानाचा आहे. कारण या दिवशी भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत पोहचविणे तसेच माजी सैनिकांचा यथोचित सन्मान करणे यासाठी राज्य शासनामार्फत 29 सप्टेंबर हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तरी जालना येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात रविवार दि.29 ऑक्टोबर 2024 रोजी शौर्य दिन आयोजित करण्यात आला आहे. तरी जिल्ह्यातील वीर पत्नी, वीर माता, वीर पिता, माजी सैनिक, विधवा व त्यांच्या अवलंबितांसह नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

