pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सत्यशोधक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे 100 शिक्षक क्लब जालना सामान्य ज्ञानस्पर्धेत यश

0 4 0 4 2 5
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.21

मानव विकास व पुर्नर्निर्माण संशोधन संस्था औरंगाबाद संचालित सत्यशोधक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोषेगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील विद्यार्थ्यांनी १०० शिक्षक क्लब जालना आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडकिल्ल्यावर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धा 2025 यामध्ये अक्षरा विलास फुके वर्ग 10 वी, विकास चंद्रभान सनान्से, ओंकार कैलास सोरमारे, कृष्णा केशव मोहिते आणि मयुर कृष्णा जाधव वर्ग 9 वा या ५ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलेले आहे. त्यांचा जालना येथे सन्माननीय जेष्ठ विचारवंत एम. जोशी, १०० क्लब चे अध्यक्ष राजेभाऊ मगर, बालसिहत्यिक डॉ. विशाल तायडे, अधिव्याख्याता श्रीहरी दराडे व इतर मान्यवर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान केला व विद्यालयातील शिक्षकांचे कौतुक केले .या विद्यार्थ्यांना इतिहासाची शिक्षिका श्रीमती सीमा लकडे , शिक्षक आनंद गरुड, दिनेश जाधव आणि पंजाब कांबळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य सुनीलजी वाकेकर साहेब संस्थेच्या सचिव श्रीमती जयश्रीताई बनकर मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच श्री संदीप फुके, श्री निलेश कंकाळ यांचे सहकार्य लाभले. या यशाबद्दल विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 4 2 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे