अती संवेदनशील असलेल्या ठिकाणी मनाठा पोलीस प्रशासनाकडून सर्व पक्षीय चर्चा
सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे यांचे लोकशाहीचा उत्सव शांततेत करण्याचे आवाहन
हदगाव/प्रभाकर डुरके,दि.16
हदगांव तालुक्यात सर्वाधिक बेसोयीचे पन्नास गावाहुन अधिक गावासाठी असलेल्या मनाठा पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काम करत असताना आपल्या वरिष्ठाच्या मार्गदर्शनातुन कमी कर्मचा-यावर कार्यक्षेत्राच्या गावपातळीवरील पुढा-यांना सोबत घेऊन गावातील सलोखा चांगला ठेवण्यासह कार्यक्षेत्रात बालविवाह रोखुन बालविवाहाचे कर्दनकाळ म्हणून ओळख निर्माण केली.
लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडत सुरु असलेल्या विधानसभा निवडणुक शांततेत पार पडाव्यात यासाठी मनाठा पोलीस ठाण्यात हद्दीतील पोलीस पाटील प्रतिष्ठित नागरिक सर्व पक्षीय नेते मंडळीची बैठक घेऊन गावक-यांच्या काॅर्नर सभा घेऊन आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन करीत कायदा सुव्यवस्थेबाबत मार्गदर्शन करीत लोकशाही बळकट होण्यासाठी मतदान प्रकीया शांततेत पार पडाव्यात यासाठी मार्गदर्शन करीत आवाहन केले.
हद्दीत मागील काळात निवडणूकीत वाद निर्माण झालेल्या गावासह अतिसंवेदनशील असलेल्या ठिकाणी गावभेटी देऊन आवश्यक त्या सुचना केल्या.यावेळी गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील प्रतिष्ठित नागरिक सर्व पक्षीय नेतेमंडळी उपस्थित होते.

