pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

भाजपा महानगर अध्यक्ष सौ.शुभांगी देशपांडे यांच्या संकल्पनेतील प्रेरित उपक्रमास भरघोस प्रतिसाद

कार्यक्रमाची सुरुवात पहेलगाम हल्ल्यातील नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून

0 4 0 4 4 7
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.27

भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंचायत राज दिनाचे औचित्य साधून दिनांक २५ एप्रिल रोजी “माझ्या स्वप्नातील गाव” या विषयावर निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ भाजपा कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला, ही स्पर्धा भाजपा महानगर अध्यक्षा सौ. शुभांगी देशपांडे यांच्या वतीने, पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती.

यामध्ये जालना शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यामध्ये ४०० पेक्षा जास्त निबंध आणि १०० पेक्षा जास्त चित्रकलेद्वारे विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पनेतील आदर्श गाव उभे केले.

बक्षीस समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्री. संतोष पाटील दानवे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्रदेश निमंत्रित सदस्य श्री.राजेश भैय्या राऊत, भाजप जिल्हाध्यक्ष श्री.बद्रीनाथ पठाडे, महानगर अध्यक्ष श्री.सतीश जाधव, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ.संध्या देठे, श्री. सिद्धिविनायक मुळे, मंडळ अध्यक्ष श्री.सुनील खरे, महेश निकम, अमोल धानोरे, संजय डोंगरे, कपिल दहेकर सांस्कृतिक प्रकोष्ट सौ.दीपा बिनीवाले आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. सौ.शुभांगी देशपांडे यांच्यासोबत, नीलावती धावणे, अमृता धावणे, सौ.अरुणा फुलमामडीकर, सौ. विशाखा नाईक, सौ.छाया पाटील, सौ.सुरेखा बोटवे, या कार्यकारिणीने विशेष मेहनत घेतली. आमदार श्री. दानवे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत सांगितले, “अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण होते आणि गावाच्या विकासाचा विचार रुजतो, हे विशेष कौतुकास्पद आहे.

 

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 4 4 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे