वन्यजीव सप्ताह निमित्त राजू मुंबईकर यांनी सात शाळांतील शालेय विद्यार्थ्यांना दिली प्राणी-पक्षी आणि वन्यजिवां बद्दल उपयुक्त अशी माहिती!
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.12
पृथ्वीवर प्रचंड जैव विविधता आहे.परंतु जंगलतोड, वाढते शहरीकरण पशु पक्षांच्या अधिवासांवर मानवी आक्रमण या सारख्यां बाबींमुळे निसर्गातील अनेक पशुपक्ष्यांच्या जाती नष्ट होत चालल्या आहेत.आणि त्या मुळे बिघडत चाललेला निसर्गाचा समतोल ही परिस्थिती बदलण्यासाठी या सप्ताहाच्या निमित्ताने मूळ संकल्पना रुजविण्यासाठी भारतात १९५२ साला पासुन वन्यजीव साप्ताह साजरा केला जातो. नामशेष होत चाललेल्या वन्य पशुपक्ष्यांबाबत जागृती निर्माण करणे हा त्यामागील हेतू आहे आणि हाच प्रांजळ हेतू उराशी बाळगून आपल्या व्याख्यानरुपी प्रबोधनातून समाजात जनजागृती करण्याचं कार्य करणारे वन्यजीव प्रेमी व्यक्तिमत्त्व राजू मुंबईकर यांच्या माध्यामातून आणि कर्नाळा पक्षीअभयारण्य वनपरिक्षेत्र वनविभाग आणि उरण वनपरिक्षेत्र वनविभाग यांच्या आयोजनातून २ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर या दरम्यान वन्यजीव साप्ताह साजरा करण्यात आला.त्या अनुषंगाने राजू मुंबईकर यांच्या व्याख्यानरुपी प्रबोधनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून सतत सात दिवस आपटे प्राथमिक शाळा, पोसरी प्राथमिक शाळा,पी.पी. मुंबईकर इंग्लिश मीडियम स्कूल रानसई प्राथमिक शाळा,पी.पी. खारपाटील हायस्कूल चिरनेर,कल्ले प्राथमिक शाळा या सात शाळांतील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या प्राणी- पक्षी आणि वन्य जीवांबद्दलची उपायुक्त अशी माहिती देत आपल्या व्याख्यानरुपी प्रबोधनात्मक कार्यक्रमातून जनजागृती केली.
कर्नाळा पक्षी अभयारण्य वनपरिक्षेत्र वनविभाग आणि उरण वनपरिक्षेत्र वनविभाग यांच्या आयोजनातून आणि राजू मुंबईकर यांनी वन्यजीव साप्ताह निमित्त सादर केलेल्या व्याख्यानरुपी प्रबोधनात्मक कार्यक्रमा द्वारे सर्वशाळांतील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या वन्यजिवां बद्दल प्राणी- पक्षां बद्दल उपायुक्त अशी माहिती देत लुप्त होत चाललेल्या आणि जंगलातील नामशेष होणार्या वन्य जीवांच्या बद्दल चिंता देखील व्यक्त केली.
वन्यजीव साप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या माध्यामातून विविध शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये वन्य जीवांच्याबद्दलच्या जनजागृती सोबतच त्या शाळांतील विद्यार्थ्यांना वन विभागातील अधिकारी वर्गाच्या वतीने खाऊचें देखील वाटप करण्यात आले. वन्य जीव साप्ताह निमित्त वन विभागाच्या वतीने आयोजित सात दिवसांच्या राजू मुंबईकर यांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमप्रसंगी महाराष्ट्र वनविभागातील उरण वनविभागाचे वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल एन. जी.कोकरे,डी.एन. दिविलकर( वनपाल उरण ),आर. एस. पवार( वनरक्षक कळंबुसरे ),एस.बी.इंगोळे ( वनरक्षक चिरनेर ),ए. सी. झेंडे ( वनरक्षक वेशवी ),श्रीमती एस.जी.पाटील ( वनरक्षक विंधणे ), एन. टी.विशे आणि कर्नाळा वनपरिक्षेत्रातील वन अधिकारी कर्मचारी वर्ग आणि उरण वन परिक्षेत्रातील वन अधिकारी आणि कर्मचारी वर्ग सोबतच सात शाळांतील शिक्षक वृंद, विद्यार्थी वर्ग उपस्थितीत होते. या सर्वांच्या उपस्थितीत हा अनोखा असा कार्यक्रम मोठय़ा उत्साहात संपन्न झाला.

