pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

उरण वासियांचे खेळाच्या हक्काच्या मैदानासाठी १९ मे ला सिडको भवनासमोर आंदोलन

0 3 2 7 5 1

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.18

उरण तालुक्याला हक्काच्या मैदानासाठी १९ मे २०२५ रोजी सर्व स्तरातील नागरिक व खेळाडू एकत्र येऊन सिडको भवन येथे आंदोलन करणार आहेत.यासाठी मागील दोन महिन्यांपासून उरण तालुक्यातील गावागावात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.यामध्ये खेळाडू,कवी,लेखक,भजन व महिला गणेशोत्सव मंडळे,कामगार संघटना आणि ग्रामस्थ मंडळ आदी या जनजागृतीमध्ये सहभागी होत आहेत.या जनजागृतीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
नवीमुंबई विकासाचा भाग असतांनाही उरण तालुक्यातील खेळाडूंना गेल्या पाच दशकात हक्काचे मैदान मिळाले नाही.त्यामुळे द्रोणागिरी स्पोर्ट्सचे अध्यक्ष महादेव घरत यांनी पुढाकार घेतला आहे.

त्यामुळे तरुण वर्गासह नागरिकांत प्रचंड संताप आहे.विकसनशील व राज्याची राजधानी मुंबई नजिकच्या उरण तालुक्यातील आपल्या हक्काच्या खेळाच्या मैदासाठी आत्ता एकजुट केली आहे.राज्यातील औद्योगिक व विकसनशील तालूका म्हणून नावारूपाला असलेल्या उरणमध्ये खेळाच्या मैदानाचा अभाव आहे.या संदर्भात खेळाडू आणि खेळ प्रेमीकडून खेद व्यक्त केला जात आहे.उरण येथील विविध खेळाडूंना सरावासाठी मुंबई किंवा नवीमुंबईत जावे लागत आहे.तर अनेकांना लांबवरचा प्रवास करून खेळाचा सराव करावा लागत आहे.त्यासाठी वेळ व पैसा खर्च होत आहे.

तालुक्यातील तरुणांनी अनेक प्रकारच्या खेळात राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळाडूंनी आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे.अनेकांनी तर परदेशात जाऊन उरणचे नाव साता समुद्रा पलीकडे पोहोचवले आहे.मात्र सामान्य आणि गरजू खेळाडूंना नियमित सराव करता येईल.किंवा खेळ खेळता येईल असे एकही मैदान उरण तालुक्यात मागील कित्येक वर्षे उपलब्ध नाही.त्यामुळे उरण वासियांना आपल्या हक्काचे खेळाचे मैदान उपलब्ध व्हावे यासाठी मागील अनेक वर्षे मागणीचा पाठपुरावा करण्यात आला.त्यासाठी खेळाडू आणि त्यांच्या समस्या सिडको आणि रायगड जिल्हा क्रीडा विभागाकडे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

मागील २० वर्षांपासून उरण तालुक्यातील खेळाडूंसाठी शासनाने क्रीडा संकुल मंजूर केले आहे.मात्र या संकुलासाठी भूखंडाचा शोध सुरु आहे.याकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित न केल्याने हे क्रीडा संकुल रखडले आहे.१० वर्षापूर्वी शासनाने निधी मंजूर करून दिला आहे.मात्र त्याचा वापर न झाल्याने सदरचा निधी परत जाण्याची शक्यता आहे.यासाठी उरणच्या नागरिकांनीही आपल्या हक्काच्या मैदानासाठी संघटित होण्याचे आवाहन अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 7 5 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे