कविवर्य प्रा. जयराम खेडेकर यांना एमजीएमचा एक लाख रुपयांचा तर कवयित्री शिल्पा देशपांडे यांना 11 हजार रुपयांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून हे पुरस्कार 18 सप्टेंबर रोजी देण्यात येणार असून त्यांनतर लगेचच काव्य मैफिल रंगणार आहे, अशी माहिती प्रा.जयराम खेडेकर यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेत अधिक माहिती प्रा. खेडेकर म्हणाले की, निखळ विशूध्द व्यापारी जालना शहराला नकाशात कवितेचं गांव म्हणून ज्यानी ओळख दिली; त्यामुळे कवितेचं समग्र योगदान छत्रपती संभाजीनगर या महदनीय संस्थेचा ’कवितागौरव’ राज्यस्तरीय काव्यपुरस्कार खेडेकर यांना घोषित झाला असून ऊमी ट्रस्ट जालना तर्फे राज्यस्तरीय स्व. कविवर्य ना. धो. महानोर काव्यपुरस्कार प्रतिभावंत, प्रयोगशिल कवयित्री शिल्पा देशपांडे, मुंबई यांना जाहीर झाला आहे.
उपरोक्त कौतुक सोहळा मस्त फकीर कविवर्य फ.मुं.शिंदे, विजय आण्णा बोराडे यांच्या हस्ते आणि भगवानराव काळे कार्लेकर व प्राचार्य डॉ.अंबादास कायंदे यांच्या उपस्थितीत तर अध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर भांदरगे पाटील यांना निमंत्रित केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.गोवर्धन मुळक, रेवगांवकर हे करणार आहेत. ’कवितागौरव पुरस्कार’ ः पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि रोख रक्कम 1,00,000/- व ’काव्यपुरस्कार’ : पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि रोख रक्कम 11,000/- रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
या कौतुक सोहळ्यानंतर लगेचच शब्दवेड्या प्रतिभावंत कलावंताची धुंद काव्यमैफलचे आयोजन असून त्यात अशोक पाठक अध्यक्षः कविवर्य फ.मुं. शिंदे, शिल्पा देशपांडे, रत्ना मोहीते, कविता बोरगांवकर, माजलग किशोर जर्हाड, बदनापुर. प्रदिप देशमुख, मंठा. तर मुख्य भाष्यकार म्हणून प्रा. जयराम खेडेकर त्यांच्या अमीट मुद्रावंत वाटचालीचे सिंहावलोकन करतील. मराठवाडा मुक्ती दिनाच्या दुसर्या दिवशी दि.18 सप्टेंबर 2024 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सायंकाळी ठिक 6 वाजता कार्यक्रम संपन्न होईल. तरी जालना जिल्ह्यातील श्रोत्ये, रसिक, साहित्यप्रेमी यांनी उपरोक्त उपक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन ’आम्ही ग्रुप’ तर्फे हरिहर शिंदे, कविता सतिश राजेजाधव आणि प्रा.डॉ.नारायण माळशिखरे, बाळासाहेब तनपुरे, प्राचार्य: डॉ. भारत खंदारे, प्रा.शशिकांत पाटील, कवयित्री प्रा. आशा कांबळे, भिमराव सपकाळ यांनी केले आहे.