सापडलेल्या स्त्री जातीच्या बाळाबाबत बाल संरक्षण अधिकाऱ्यांचे आवाहन

जालना/प्रतिनिधी,दि.10
जुना जालना येथील श्रीराम मंदिर राहुल नगर येथे बुधवार दि. 3 एप्रिल 2024 रोजी स्त्री जातीचे अंदाजे सात ते आठ दिवसाचे बाळ आढळून आले कायमस्वरूपी परित्याग करण्याच्या दृष्टीने बाळाला सोडून पळ काढला. सदरील घटनेची नोंद कदीम पोलिस ठाणे जालना येथे घेण्यात आलेली आहे व बालकल्याण समिती जालना यांच्या आदेशाने सदरील बालिकेस साकार संस्था छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले आहे. तरी सदरील बालिकेचा सांभाळ करण्याची इच्छा असल्यास नैसर्गिक पालकांनी बालकल्याण समिती जालना किंवा कदीम पोलीस ठाणे जालना किंवा साकार संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्याशी संपर्क साधावा. अन्यथा सदर बालिकेचे दत्तक विधानाद्वारे पुनर्वसन करण्यात येईल, अशी माहिती साकार संस्थेचे अधीक्षक तुषार दापके यांनी दिली असल्याचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.