pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

बरडशेवाळा आरोग्य केंद्रात गटविकास अधिकारी कैलास बळवंत यांची भेट शवविच्छेदन केंद्र रुमसह कामाचा घेतला आढावा

0 1 7 7 6 4

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.30

शासकीय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील घटनेनंतर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये ,प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्रात रुग्णाची गैरसोय होवु नये म्हणुन जिल्हाधिकारी डॉ अभीजित राउत व मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या आदेशानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य उपकेंद्राला अधिका-यांनीे भेट देऊन आवश्यक सुचना दिल्या जात आहेत.
गुरुवार सव्वीस आक्टोंबर रोजी हदगांव पंचायत समिती चे गट विकास अधिकारी कैलास बळवंत यांनी बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रस्तुती सह कुटुंब शस्त्रक्रिया वार्ड आरोग्य केंद्रातील सर्व वार्डासह स्वच्छता गृह व परीसराची पाहणी केली. नवीन सुरु असलेल्या शवविच्छेदन केंद्र रुम कामास भेट देऊन दैनंदिन ओपीडी चा आढावा घेत ग्रामीण भागात सरासरी दररोजची दोनशे ओपीडी बघुन समाधान व्यक्त केले.खडकाळ जमीनीवरील घनवन व आयुष्मान गार्डन बघुन समाधान व्यक्त केले.आरोग्य केंद्रातील रिक्त पदासह विविध विषयांवर चर्चा करीत आवश्यक मार्गदर्शन केले . बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचारीवर्गाचे काम कौतुकास्पद असल्याचे सांगीतले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ एस बी.भिसे , यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक , सहाय्यीका, सेवक सेवीका सर्व केंद्रातील कर्मचारीवर्ग उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 6 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे