pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्ह्यात 5 केंद्रावर एमएचटी-सीईटी सामाईक परीक्षेचे आोजन

0 3 1 5 3 6

जालना/प्रतिनिधी,दि.8

जिल्ह्यात शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, बी.प्लानिंग व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जिल्ह्यातील 5 परीक्षा उपकेंद्रावर दोन सत्रात दि.9 ते 17 एप्रिलपर्यंत पीसीबी तर दि. 19 ते 27 एप्रिल 2025 या कालावधीत पीसीएम ग्रुपची एमएचटी-सीईटी सामाईक परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती  अपर जिल्हादंडाधिकारी गणेश महाडिक यांनी दिली आहे.

जाफ्राबाद येथील ड्रीम फ्युचर साई कॉम्प्युटर, जालना येथील जेईएस महाविद्यालय व मस्त्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालय, नागेवाडी येथील शासकीय तंत्रनिकेतन आणि बदनापूर येथील व्ही.एस.एस.इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी या उपकेंद्रावर परिक्षा आयोजित करण्यात आली आहे.  परीक्षा उपकेंद्रावर भेटी देणे व उपकेंद्रावरील अनुचित प्रकारास प्रतिबंध करण्यासाठी उपविभागीय अधिकारी जालना यांची उपविभागीयस्तरावर तसेच संबंधित तहसीलदार यांची तालुकास्तरावर भरारी पथकप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  कार्यालयीन स्तरावर वर्ग-1 व वर्ग-2 चे 4 अधिकारी यांची निरीक्षक म्हणून तसेच वर्ग-3  व व र्ग-4 चे 3 कर्मचारी सहाय्यक म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 5 3 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे