प्रितम स्पोर्ट्स कडापे आयोजित क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.9
प्रितम स्पोर्ट्स कडापे च्या रोप्यमहोत्सव वर्षा निमित्ताने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन प्रितम स्पोर्ट्स कडापे च्या वतीने उरण तालुक्यातील कडापे गावात करण्यात आले होते .क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन आवरे गावचे सामाजिक कार्यकर्ते संतोष रघुनाथ थळी, मनसे उरण पूर्व विभाग अध्यक्ष अनिल गावंड ,सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे ,आदर्श शिक्षक अशोक महादेव म्हात्रे यांच्या शुभ हस्ते झाले.तर या क्रिकेट स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस तालुका अध्यक्ष उरण विनोद म्हात्रे , मनसे उरण तालुका अध्यक्ष सत्यवान भगत ,आवरेच्या सरपंच श्रीमती निराबाई सहदेव पाटील,ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील, युवासेना अध्यक्ष अमित म्हात्रे ,सुयश क्लासेस आवरे अध्यक्ष निवास गावंड,माजी उपसरपंच आवरे धनेश गावंड,मिलिंद शामकांत गावंड,विनोद साळवी गट प्रमुख कॉटन ग्रीन शिवसेना उबाठा, सुनील म्हात्रे मनोज गावंड माजी उपसरपंच आवरे,संदीप गावंड माजी गावाध्यक्ष आवरे, मनोज पाटील सदस्य ग्रामपंचायत गोवठणे,प्राची निर्णय पाटील सदस्या ग्रामपंचायत गोवठणे उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्र संचालन जितेंद्र थळी यांनी केले तर समालोचन निवास गावंड सूरज म्हात्रे व दौलत भोईर ह्यांनी केले.तसेच विद्यार्थी गुणगौरव,प्रितम स्पोर्ट्स कडापे संघाच्या माझी कर्णधार व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.बक्षीस वितरण महेंद्र म्हात्रे माजी कर्णधार कडापे,
रुपेश म्हात्रे, सुरेश थळी,कमलाकर थळी,प्रवीण थळी,संतोष म्हात्रे सूरज म्हात्रे,संदेश म्हात्रे,उमेश म्हात्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले,या स्पर्धेत जय हनुमान गोवठणे विजेता तर तिरंगा स्पोर्ट्स आवरे हा संघ उपविजेता ठरला.अंतिम सामन्याचा सामनावीर गोवठणे संघाचा संकेत ठरला. स्पर्धेत गोवठणे संघाचा स्वस्तिक उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार देण्यात आला,तर तिरंगा स्पोर्ट्स संघाचा साहिल भोईर ह्याला स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज व मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.प्रथम क्रमांक जयहनुमान गोवठणे,द्वितीय क्रमांक तिरंगा स्पोर्ट आवरे,मॅन ऑफ द सिरीज सिद्देश -तिरंगा स्पोर्ट आवरे,
बेस्ट गोलंदाज -स्वस्तिक- जयहनुमान गोवठणे यांनी पटकविला.स्पर्धेला लागणारे सन्मान चिन्हे देवयानी मारुती म्हात्रे यांच्या स्मरणार्थ प्राप्ती प्रशांत म्हात्रे यांजकडून देण्यात आले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रितम स्पोर्ट्स कडापे संघाचे सर्व खेळाडू सहकारी आजी माजी खेळाडू ग्रामस्थ ह्यांनी सहकार्या केल्याबद्दल आभार मानण्यात आले.उपस्थित मान्यवर व पाहुण्यांचे आभार प्रशांत म्हात्रे यांनी व्यक्त केले.