pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

२०२५ च्या वुशू क्रीडा स्पर्धेत अथेन्स ग्रीस येथे राकेश बेदीने पटकाविले सिल्वर मेडल

भारतामध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण. देशासाठी खेळणाऱ्या राकेश बेदी यांचे सर्वत्र कौतुक ● राकेश वर अभिनंदन,शुभेच्छांचा वर्षाव

0 3 1 5 3 6

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.5

आयएनएस टुनिर (भारतीय नौदल) उरण येथील अग्निशमन मुख्यालयातील नागरी संरक्षण कर्मचारी राकेश बेदी यांनी अथेन्स ग्रीस येथे २०२५ मध्ये संपन्न झालेल्या अ‍ॅक्रोपोलिस आंतरराष्ट्रीय वुशू स्पर्धेत भाग घेउन सिल्व्हर मेडल मिळवत भारताचे नाव उंचाविले आहे.राकेश मनोज बेदी हे राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय वुशू, जु-जित्सू आणि ज्युडो खेळाडू आहेत. अलिकडेच २८ फेब्रुवारी २०२५ ते २ मार्च २०२५ दरम्यान ग्रीसमधील अथेन्स शहरात संपन्न झालेल्या अ‍ॅक्रोपोलिस आंतरराष्ट्रीय वुशू चॅम्पियनशिप २०२५ साठी त्यांची निवड झाली होती. आणि या स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करत राकेश बेदी यांनी इतिहास रचत सिल्वर मेडल प्राप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला राकेश बेदी यांनी सिल्वर मेडल मिळवून दिल्याने राकेश बेदी यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.राकेश बेदी यांनी सर्वांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली आहे. कमांडिंग ऑफिसर, आयएनएस तुनीर, कार्यकारी अधिकारी आयएनएस तुनीर, कमांडर एन राजेश खन्ना, लेफ्टनंट कमांडर शाहीन हुसेन, सुहेल अहमद (वुशू इंडिया), प्रीतम म्हात्रे (दादा), मनोहरशेठ भोईर, अनिकेत अनिल कुडाले, जयपाल सिंग नेगी, स्टेशन ऑफिसर एम बी थळी, सुनील गुर्जर, कुलदीप सिंग, जयराज पी जयकुमार, गणेश डी पाटील (कोटनाका), बलराज पानसरे, एच ​​बी पाटील, आशिष गोवारी, सागर चौहान, अनिता लांजेवार सतीश म्हात्रे, सुजाता गजकोश, सुमन कुमारी,श्रीकांत भगत, भारती म्हात्रे, सीई विभाग, सागर चव्हाण, प्रशिक्षक किलमन पाउलो फर्नांडिस आणि वेस्टर्न नेव्हल कमांड (भारतीय नौदल), वुशू असोसिएशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र जू-जित्सू असोसिएशन या सगळ्यांनी दिलेल्या सर्व सहकार्याबद्दल राकेश बेदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. राकेश बेदी हे एक चांगले आणि वुशू, ज्युडो/जु-जित्सू(ॲथलीट),भारतीय नौदल आणि महाराष्ट्रचे प्रतिनिधित्व करणारे उत्तम खेळाडू आहेत.त्यामुळे भारताला एक उत्तम खेळाडू मिळाल्याने भारताचे नाव आता सातासमुद्रापलीकडे गेले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 5 3 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे