शेतकऱ्यांचा मुलाची झाली राज्य विक्रीकर अधिकारी म्हणून निवड
कुटुंबासह गावक-यांनी केले स्वागत

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.13
बरडशेवाळा ता.हदगांव येथील लहान मोठे लेकीबाळी सह जवळपास पन्नास सदस्य असलेले मोठ्या संख्येचे शेतकरी कुटुंब म्हणून स्वर्गीय विठ्ठलराव मस्के यांच्या कुटुंबाकडे पाहिले जाते.विशेष म्हणजे हे कुटुंब आजही एकत्रित कुटुंब पद्धतीचा आदर्श घेण्यासारखे कुटुंब आहे.मस्के कुटुंब शेतीवर अवलंबून न राहता शेतीला पूरक जोडधंदा म्हणून गुळ कारखान्यासह हंगामानुसार एकजटीने सर्व जण काम करतात.यामुळे या कुटुंबाला सर्वत्र टाटा नावाने ओळखतात. घरात कोणीही साधे सेवक म्हणून पदावर नसताना सोपान सोनबाराव मस्के यांनी आपल्याच जन्मभुमीतील गावात जिल्हा परिषद शाळेत सहावीपर्यत शिक्षक घेत पुढील शिक्षण अहमदपूर विद्यालयात दहावीत 86 टक्के घेतले.तर बारावीत सायन्स मध्ये 72 टक्के घेतले. नांदेड येथे शिक्षण पुर्ण करीत सोलापूर येथे बिऐएमएस पुर्ण केले. जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करत नुकत्याच झालेल्या एमपीएससी परीक्षेत यशाला गवसणी घालत राज्य विक्रीकर अधिकारी म्हणून निवड झाली. बुधवार बारा रोजी सांयकाळी सोपान गावात येताच कुटुंबासह गावातील प्रतिष्ठित नागरिक युवक महिला नातेवाईक मंडळीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन स्वागत करीत शुभेच्छा दिल्या.तर बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातही सोपान च्या यशाबद्दल सन्मान करण्यात आला.
गावातील प्रतिष्ठित नागरिक दादाराव नाईक , बळवंतराव नाईक , भगवानराव मस्के, पंतीगराव मस्के संजय नाईक, यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक युवक मंडळी कुटुंबासह नातेवाईक उपस्थित होते.तर आरोग्य केंद्रात सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे ,वैद्यकीय अधिकारी डॉ.एस बी भिसे ञानेश्वर मस्के प्रभाकर धाडेराव दत्तात्रय पाटील रामेश्वर मस्के आंनदराव मस्के गजानन अनंतवार कवानकर विकास कांबळे विशाल शिरफुले सामाजिक कार्यकर्त्या सविता निमडगे पळसेकर ,प्रभाकर दहिभाते बरडशेवाळा पळसा येथील सरपंच प्रतीनिधी, पोलीस पाटील,गावातील प्रतिष्ठित नागरिक आरोग्य केंद्रातील कर्मचारीवर्ग उपस्थित होते.