मंत्री अतुल सावे यांचा भव्य सत्कार सोहळा छत्रपती संभाजी नगर शहरांमध्ये संपन्न

आनिल वाढोणकर/ छ. संभाजीनगर,दि 23
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मंत्री मंडळात छ.संभाजीनगर पुर्व विधानसभेतील भाजप व महायुतीचे आमदार श्री अतुल सावे साहेब यांची ओबीसी कल्याण, दुग्धविकास व नैसर्गिक उर्जा मंत्री म्हणून निवड झाल्या नंतर पहिल्यांदाच शहरात आगमन झाले. याचे औचित्य साधून शहरातील ३८ चौकात ढोल ताशाच्या गजरात जेसीबी व क्रेन ने पुष्पवृष्ठी करत स्वागत केले. हि मिरवणूक र्हसुल सावंगी ते सिडको बस स्टँड, मार्गे क्रांतीचौक, गुलमंडी व शेवटी संस्थान गणपती मंदिरात आरती करून मिरवणूकीचा समारोप करण्यात आला. या वेळी सेव्हन व्हील येथे मल्हार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रामदासजी कोळेकर गोविंदजी केंद्रे प्रशांत जी देसरडा मंगलमूर्ती शास्त्री शैलेश हेकाडे प्रमोद खाडे गोविंद डुरके दत्तात्रय रोडगे आनिल वाढोणकर भाजप पदाधिकाऱ्यांसह शहरातील व्यापारी, उद्योजक, डॉक्टर, वकील व विविध संघटनेच्या वतीने नागरिकांनी उस्फुर्त पणे स्वागत केले