पळसा येथील बिरोबा महाराज यात्रेला सुरुवात लहाडी लोटांगणा सह विविध स्पर्धेचे आयोजन

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.28
तालुक्यातील सर्वाधिक भारतीय सैनिकासह ग्रामदैवत बिरोबा महाराज मंदिर व स्मशानभूमी आबादीतील बिरोबा महाराज मंडळातील युवक वर्ग ग्रामपंचायत सह गावकरी दानशूर व्यक्तीच्या पुढाकारातून झालेल्या कायापालटाने आकर्षण ठरत आहे. ग्रामदैवताच्या देवदर्शनास माळावर येजा करणा-यासाठी पुर्वी भक्तासाठी पायी येजा करावी लागत होती. माजी आमदार नागेश पाटील आष्टिकर यांनी स्वखर्चातुन कच्चा तर आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी स्थानीय निधीतुन पक्का रस्ता करुन दिल्याने देवदर्शनास वाहतुक सुरुवात झाली आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बिरोबा महाराज यात्रेनिमीत्य एकोणीस फेब्रुवारीपासून ह.भ.प.प्रशांत तोरे महाराज लातूरकर यांचे आयोजित करण्यात आलेल्या शिवमहापुराण कथेसह दररोज सकाळ काकड आरती पारायण भजन कथा हरिपाठ किर्तन अन्नदात्याकडुन महाप्रसादाने गावातील वातावरण भक्तिमय निर्माण झाले आहे.सोमवार सव्वीस फेब्रुवारी रोजी कथेची समाप्ती महाप्रसादानंतर सांयकाळी अग्नीतुन लहाडी लोटांगणाची तयारी करण्यात आली असून यासाठी भक्त मंडळीची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे.
यावर्षी यात्रेनिमीत्य शंकर पट, मॅरेथान स्पर्धा ,कब्बडी , क्रिकेट चे आयोजन करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात बक्षीसे ठेवण्यात आली आहे. यात्रेनिमीत्य आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी समिती ग्रामपंचायत गावकरी मंडळी परीश्रम घेत आहेत. तर यादरम्यान कार्यक्रम शांततेत पार पडावे यासाठी मनाठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे उपनिरीक्षक नागनाथ तुकडे बिट जमादार श्याम वडजे यांच्यासह मनाठा पोलीस प्रशासन सज्ज आहे.