pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सेलगाव येथील जि.प.शाळेतील आदर्श मतदान  केंद्रास जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देवून केली पाहणी

0 3 2 7 0 8

जालना/प्रतिनिधी,दि.12

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या पार्श्वभूमीवर जालना लोकसभा मतदार संघात सोमवार दि. 13 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. या अनुषंगाने बदनापूर तालुक्यातील सेलगाव येथील आदर्श मतदान केंद्रास जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रत्यक्ष भेट देवून सेलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान कक्षातील संरचना, व्यवस्थेसह सर्व परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मतदान केंद्रातील आवश्यक सुविधा व सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व यंत्रणेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन तत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणूक प्रक्रिया निर्भय, नि:ष्पक्षपातीपणे आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. तरी जालना जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान प्रक्रियेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपला मतदानाचा अमुल्य हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

                  

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 7 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे