श्री गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने बजाजनगर येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात विविध उपक्रमासाठी पंचक्रोशीतील भाविक सेवेकऱ्यांची अलोट गर्दी

छ.संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.3
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ-त्र्यंबकेश्वर येथील पिठाधिष गुरूमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाने बजाजनगर येथील सेवा केंद्रात श्री गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने श्री गुरू पुजन करून गुरूपद घेण्यासाठी पंचक्रोशीतील सर्व भाविक सेवेकऱ्यांची दिवसभर रिघ पहाण्यास मिळाली. सर्व रस्त्यावर सेवेकऱ्यांची गर्दी दिसत होती.
पहाटे ५.०० वाजता सामुदायिक महाभिषेकानंतर उत्सवाला सुरवात झाली. सेवा मार्गाच्या २०% अध्यात्म आणि ८०% समाजकार्य या उक्तीला प्रेरीत होऊन सेवा मार्गाला अपेक्षित अनेक सामाजिक उपक्रम बजाजनगर सेवा केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात आले. यामध्ये वृक्षारोपण, मोफत सर्व रोग निदान शिबीर, नेत्र रोग तपासणी शिबीर व रक्तदान शिबीराचा समावेश होता.मोफत सर्व रोग निदान शिबीरामध्ये डॉ. गौरव सुधाकर चामले, डॉ. रोहित गावंडे, डॉ. विजया राऊत, डॉ. नारायण राजपूत, डॉ. चंद्रशेखर जाधव, डॉ. संतोष कुमावत, डॉ. प्रियदर्शिनी कुमावत, डॉ. श्रध्दा परितकर, डॉ. माया देशमुख, डॉ. शुभम देवीदास अपार, डॉ. बिपीन सोनवणे, डॉ. महादेव संकपाळ, डॉ. गणेश गोरे, डॉ. स्नेहल खरडे, डॉ. योगेश बादले, डॉ. स्नेहल पाटेकर या सर्व तज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा रूजू केली. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील रक्तपेढी उपलब्ध करून रक्तदान शिबीर राबविण्यात आले.
सकाळी ११.०० वाजता ५१ वृक्ष लावून वृक्षारोपण करण्यात आले. दिवसभरात एकुण २३,००० सेवेकऱ्यांनी दर्शनाचा लाभ घेत ८७३२ सेवेकऱ्यांनी श्री गुरूपुजन करून गुरूपद घेतले. एकुण ७८ सेवेकऱ्यांनी रक्तदान शिबीरात सहभाग नोंदवला. तसेच १६०० पेक्षा जास्त भाविक सेवेकऱ्यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घेतला.
उत्सव यशस्वीपणे साजरा करण्यासाठी बजाजनगर सेवा केंद्रातील युवा प्रबोधन प्रतिनिधी व सर्व सेवेकऱ्यांनी आपली सेवा श्री स्वामी महाराजांच्या चरणी रूजू केली.