विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्या हस्ते राणी उंचेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थींनींना सायकल वाटप

जालना/प्रतिनिधी,दि.13
घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत 29 लाभार्थी विद्यार्थींनींना विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्या हस्ते सायकलीचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास आमदार राजेश टोपे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, उपविभागीय अधिकारी दीपक पाटील, तहसीलदार योगिता खटावकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सुर्यवंशी, गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, शिक्षणाधिकारी मंगल धुपे, गटशिक्षणाधिकारी रविंद्र जोशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर नाटकर, मुख्याध्यापक माया कवाणकर आदिची उपस्थिती होती.
यावेळी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्या हस्ते जंतनाशक दिनानिमित्त गोळ्यांचेही विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. इस्त्रोची सहल करुन आलेल्या मुलांना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. तसेच विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या विजेत्या विद्यार्थ्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.