pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

शंभू महादेव विद्यामंदिर विज्ञान दिन साजरा

0 3 2 6 4 0

विरेगाव,/गणेश शिंदे, दि.1

वाटुर येथील शंभू महादेव विद्यामंदिर शाळेत विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी महान भारतीय भौतिक शास्त्रज्ञ डॉ.सी. व्ही. रमण यांच्या १९२८ च्या रमण प्रभाव या संशोधनाची आठवण करून विज्ञान दिन साजरा करण्यात आला. या आयोजनामागे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा आणि नवकल्पना वाढावी आणि आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञानाचे महत्व अधोरेखित व्हावे हा हेतू होता.
यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवरील प्रयोगाची सादरिकरणे तयार केली.जे विज्ञानाच्या मानवतेसाठी विविध्द आणि गहन योगदानावर प्रकाश टाकतात.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डी. डी. अदबने यांनी विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाबद्दल आणि नावीन्यपूर्ण सादरीकरनाबद्दल आनंद व्यक्त केला.कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक
एम.पी. मिसाळ व शाळेतील अन्य सर्व शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेसाठी बी.एस.राठोड, बी.डी. सोनकांबळे, व्ही. व्ही. कांगणे आदींनी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 6 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे