pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

बुधवारी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या भरती मेळाव्याचे आयोजन

0 3 2 6 0 5

जालना/प्रतिनिधी,दि.20

राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना कार्यान्वयीत  करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक उमेदवारांना संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जालना येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत बुधवार दि. 25 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जालना जिल्ह्यातील जवळपास 60 ते 70 आस्थापना बेरोजगार युवकांची भरती करण्यासाठी मेळाव्यामध्ये उपस्थित राहणार आहेत. तरी या मेळाव्यासाठी बारावी, आयटीआय तसेच पदविका व पदवीधर अशी शैक्षणिक अहर्ता प्राप्त असलेले 18 ते 35 वयोगटातील सर्व उमेदवार या योजनेचा लाभ घेऊ  शकणार आहेत. अधिक माहितीसाठी ए.एस.धाबे 9922531766 आणि एस.जी. चव्हाण 9763607850 यांच्याशी संपर्क साधावा. या संधीचा सर्व बेरोजगार युवकांनी मेळाव्यास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य तथा सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार आर. एस. शेळके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 6 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे