pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शन उत्साहात

0 3 2 5 6 4

जालना/प्रतिनिधी,दि.27

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत जालना येथे जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शन उत्साहात पार पडले. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक जितेंद्र राठी यांच्या हस्ते झाले. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्य श्रीमती शेळके, प्रसिद्ध उद्योजक घनश्याम गोयल, लघुउद्योग भारती संघटनेचे अध्यक्ष सतीश भक्कड, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अतुल केसकर, प्राचार्य राजेश धानोरकर, प्राचार्य डी.एम.राठोड, प्राचार्य एम .ए. के. शेख, जिल्ह्यातील सर्व आयटीआयचे गटनिर्देशक, शिल्पनिर्देशक व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
जिल्ह्यातील आठ शासकीय तर एका अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने आपला सहभाग नोंदवून 59 प्रकल्प प्रदर्शनासाठी आणले होते. प्रदर्शन पाहण्यासाठी जालनातील विविध शाळेतील विद्यार्थी आले होते. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी व प्राचार्य यांच्या हस्ते पहिल्या दहा विजेत्यांना बक्षीस वितरण केले. लॉजिक गेट सिम्युलेटर अँड इलेक्ट्रिकल फॉल्ट सिम्युलेटर आयटीआय जालना, वन मिनिट सारी आयटीआय परतुर, ऑटोमॅटिक कंट्रोल रूम आयटीआय बदनापूर, सीड सोयलिंग मशीन आयटीआय जालना, पार्टी वेअर सारी आयटीआय भोकरदन, पावर जनरेशन ऑटो स्ट्रीट लाईट आयटीआय जाफराबाद, थीन रिंग्स विथ मेटल बार बेंडर आयटीआय मंठा, 33- केवी इलेक्ट्रिक सब स्टेशन आयटीआय घनसावंगी, अग्निशामक नियंत्रण उपकरण आयटीआय अंकुशनगर, बेस्ट आऊट ऑफ वेस्ट आयटीआय जालना यांनी सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली मोरे यांनी केले. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनात संस्थेतील प्राचार्य, गटनिर्देशक सर्व शिल्प निर्देशक व कार्यालयांनी कर्मचारी व भंडार कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. असे प्राचार्य, हुतात्मा जनार्दन मामा नागापूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 5 6 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे