pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

बंदर कामगारांच्या पगारवाढीस साडेआठ टक्के मंजुरी

0 3 2 5 9 6

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.28

नवी दिल्ली येथे पार पडलेल्या बैठकीत आय.पी.ए.चे व मुंबईचे पोर्ट ट्रस्ट चे चेअरमन मा.राजीव जलोटा, मॅनेजिंग डायरेक्टर मा.विकास नरवाल आणि सहा कामगार महासंघाचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बंदर कामगारांना साडेआठ टक्के वेतनवाढीस मंजुरी देण्यात आली.त्याच बरोबर १/१/२०२२ पासून ते ३१/ १२ /२०२६ अखेर पाच वर्षाच्या या वेतन करारात ३२ महिन्यांचा एरियस मिळणार आहे .तसेच ५०० रुपये स्पेशल अलाउन्स मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर ३०% व्ही.डी.ए.देण्यात येणार आहे.अशा प्रकारचा कामगारांच्या हिताच्या आणि जिव्हाळ्याच्या वेतन कराराच्या एम.ओ.यु.वर या बैठकीत सह्या केल्या गेल्या.वेतन कराराची ही आठवी बैठक होती.पुढील १५ दिवसात या सेटलमेंट वर प्रत्यक्ष सह्या होतील.
या वेतन करारात भारतीय मजदूर पोर्ट अँड डॉक महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री व वेतन करार समितीचे सदस्य सुरेश पाटील, भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघ (बी एम एस ) राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुधीर घरत यांनी कामगारांच्या बाजूने मोलाची आणि भरीव भूमिका बजावली. त्यांच्या सोबत भारतीय मजदूर पोर्ट अँड डॉक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीकांत राय, ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक चे मोहम्मद हनीफ, केरसी पारिख, अफराज,विद्याधर राणे,मोहन आसवाणी, नरेंद्र राव इत्यादी पदाधिकारी सहभागी होते. या वेतन करार मंजुरीत मा. केंद्रीय पोर्ट्स शिपिंग व जलमार्ग कॅबिनेट मंत्री मा. सर्वानंद सोनोवाल तसेच भारतीय मजदूर संघाने विशेष सहकार्य केले. मा. केंद्रीय पोर्ट्, शिपिंग व जलमार्ग कॅबिनेट मंत्री मा. सर्वानंद सोनोवाल
यांनी कामगारांच्या हिताच्या बाजूने सहकार्य केल्याने कामगारांत समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे या वेतन करारासाठी २८ ऑगस्ट पासून घोषित केलेला संप सर्व कामगार महासंघाने रद्द केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 5 9 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे