बरडशेवाळा सह परिसरात विश्वकर्मा जंयती साजरी.

हदगाव/ प्रभाकर डुरके,दि.23
हदगाव तालुक्यासह बरडशेवाळा पळसा मनाठा पिंपरखेड चिंचगव्हान वरवट कवाना सह परिसरात गुरुवार बावीस फेब्रुवारी रोजी सकल सृष्टीचे निर्माण कृर्ता प्रभु भगवान विश्वकर्मा जंयती विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.
बरडशेवाळा ता.हदगांव येथे विश्वकर्मा जंयती निमीत्य आरती महाप्रसाद संपन्न झाला.यावेळी विश्वकर्मा संघटना हदगांव तालुका अध्यक्ष गोविंदराव कुमकर, गणेशराव कुमकर, बालाजी गरुडे, गोरखनाथ कुमकर, गंगाधर कुमकर, नारायणराव कुमकर ,यशवंतराव कुमकर , रुस्तुमराव कुमकर, सुभाष कुमकर, मारोतराव कुमकर, बालाजी कुमकर, सतीश वाकडे, नारायण इंगळे, ईश्वर कुमकर,भगवानराव मस्के,सामाजिक कार्यकर्त्या सवीताताई निमडगे पळसेकर, गजानन सुर्यवंशी, संदीप बेंबरकर, अशोक कदम, ञानेश्वर कुमकर, पांचाळ परीवारासह गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच प्रतिष्ठित नागरिक समाज बांधव उपस्थित होते.