पाटबंधारे विभागाअंतर्गत थकीत पाणीपट्टी भरण्याचे आवाहन
जालना/प्रतिनिधी,दि. 28
पाटबंधारे प्रकल्पातुन बिगर सिंचन योजनेस पाणी पुरवठा करण्यात येतो. पाण्याच्या वापरानुसार विभागाची 855.53 लक्ष बिगर सिंचन पाणीपट्टी थकीत आहे. सर्व योजना धारकांना पाटबंधारे विभागाद्वारे जाहीर आवाहन करण्यात आले आहे की 7 दिवसाच्या आत पाटबंधारे विभाग जालना यांच्या नावे धनादेशाद्वारे पाणीपट्टी भरावी अन्यथा संबंधीत योजनेच्या पाणी पुरवठ्यासह विद्युत पुरवठा दि. 5 मार्च 2024 पासून खंडीत करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे, कार्यवाही उद्भवणाऱ्या जनक्षोभास कार्यालय जबाबदार असणार नाही याची गांर्भियाने नोंद घ्यावी, असे कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
खाली दिल्याप्रमाणे पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत थकीत पाणीपट्टीची गावे व रक्कम दिलेली आहे
नगर परिषद परतुर – 40.38 लक्ष रुपये, महानगरपालिका, परभणी- 191.66 लक्ष रुपये ,जिल्हा परिषद, परभणी -74.72 लक्ष रुपये, नगर परिषद पुर्णा – 107.91 लक्ष रुपये, नगर परिषद सेलु -83.62, महानगरपालिका नांदेड -135.94 लक्ष रुपये, नगर पंचायत मंठा 18.49 लक्ष रुपये, 176 व्हिलेज ग्रीड ड्रिकिंग वॉटर स्कीम एमजेपी जालना -20.53 लक्ष रुपये, नगर परिषद भोकरदन -44.14 लक्ष रुपये, रामेश्वर साखर कारखाना -77.45 लक्ष रुपये, नगरपंचायत बदनापुर -15.99 लक्ष रुपये, कृषी महाविद्यालय बदनापुर – 0.32 लक्ष रुपये, नगर पंचायत मंठा -34.24 लक्ष रुपये, नगर पंचायत अंबड – 5.14 लक्ष रुपये,