pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मंत्री दादा भुसे यांचा तिवसा‎ दौरा:विद्यार्थांनी गायलेल्या राष्ट्रसंतांच्या भजनात रमले शिक्षण मंत्री

0 3 2 3 8 4

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.7

मोर्शी : तिवसा प्यारा हिंदुस्थान है, गोपालो की शान है’, ‘असा हा संतांचा संग’, ‘मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे’ आदी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भजने गात गुरूकुंजातील श्री गुरुदेव विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना मंत्रमुग्ध केले. गुरूवारी ६ फेब्रुवारीला दौऱ्यावर असताना गुरूकुंजातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचे दर्शन घेऊन श्री गुरुदेव विद्यामंदिर या शाळेला भेट देत त्यांनी पाहणी केली. त्या वेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रसंतांची भजने गायली. शालेय शिक्षण मंत्र्यांच्या भेटी दरम्यान इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी कविता व राष्ट्रसंतांची भजने ऐकत त्यांचे मन जिंकले. सकाळी दहा वाजता शाळा सुरू झाली. शालेय प्रार्थना पाठ होत असताना शालेय शिक्षण मंत्री भुसे हे नागपूर येथून अमरावतीच्या दौऱ्यावर जात असताना ते राष्ट्रसंतांच्या महासमाधी स्थळी अभिवादन करण्याकरिता थांबले. अभिवादनानंतर त्यांनी श्री गुरुदेव विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाला भेट देत पाहणी केली. या वेळी शाळेचे प्राचार्य मनोज कडू यांनी शाळेची माहिती दिली. या वेळी अ. भा. श्री गुरुदेव सेवा मंडळ व शाळा सेवा समितीतर्फे शिक्षणमंत्र्यांना पुष्पगुच्छ, ग्रामगीता, शाल देऊन सन्मानित केले.. या प्रसंगी गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी लक्ष्मण गमे, सरचिटणीस जनार्दन बोथे, शालेय शिक्षण विभागाच्या संचालक नीलिमा टाके, प्राचार्य मनोज कडू, धीरज इंगळे, अमोल बांबल, किशोर अगडे उपस्थित होते. यशाचे शिखर गाठण्यासाठी शिका, अभ्यास करा : शिक्षण मंत्री या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, विद्यार्थ्यांनो, जीव.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 3 8 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे