गंगाधर देविदास सावंत यांनी ग्रँट रोड वरील साऊथ फ्रेयेर ब्रिज वरील दोन बस स्टॉप वर पत्र्याची शेड बेस्ट व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून बसवून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले.

मुंबई/प्रतिनिधी, दि.28
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार चे ग्राहक सेलचे दक्षिण मुंबई चे जिल्हा अध्यक्ष श्री गंगाधर देविदास सावंत यांचे गिरगावात ग्रांट रोड नाना चौक येथे सर्वत्र त्यांच्या लोकउपयोगी कामाचे कौतुक होत आहे. श्री गंगाधर देविदास सावंत वर्षे १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश करून सदर पार्टीच्या माध्यमातून अडल्या नडलेल्याला,गरीब,होतकरू माणसांना जशी जमेल तशी मदत केली.व अनेक सामाजिक कार्य केली व आजतागायत करत आहेत.आज पुन्हा एकदा “गंगाधर देविदास सावंत ” हे नाव जनसामान्यांच्या चर्चेत पुढे आले आहे. राजकारणात नोकरी सांभाळून व समाजसेवेची प्रबळ ईच्छा बाळगून समाजसेवा करणारे श्री.गंगाधर देविदास सावंत ह्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या समाजसेवेतून सर्वांना दाखवून दिले आहे कि,मराठी माणूस समाजकारणातहि कुठेहि मागे नाही.
ग्रेंन्ट रोड परिसरात वास्तव्यास असणारे व सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ग्राहक सेल चे दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष श्री.गंगाधर देविदास सावंत यांच्याकडे ग्रॅन्ट रोड वरील “साऊथ फ्रेअर ब्रिज”वरील स्थित दोन बस स्टॉप पत्र्याची शेड लावून देण्यात यावी या निवेदनानुसार त्या तक्रारीची दखल श्री गंगाधर देविदास सावंत यांनी घेऊन त्यांनी “बेस्ट ” व ” बृहन्मुंबई महानगर पालिकेला “आपल्या पत्रकाद्वारे सूचित करून त्यांना ग्रॅन्ट रोड वरील “साऊथ फ्रेअर ” ब्रिज वरील दोन बस स्टॉप वर ” बेस्ट” व ” बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ” माध्यमातून उत्तम प्रतीची पत्र्याची शेड बसवून देऊन ग्रॅन्ट रोड मधील नागरिकांना उन्हाळा / पावसाळ्यात सदर दोन्ही बस स्टॉप वर उभे राहण्यास होणारी गैरसोय दूर केली.व ह्यापुढे दक्षिण मुंबईत अशीच सामाजिक कार्ये करून जनसामांन्याचा विश्वास जिंकू असे विधान श्री.गंगाधर देविदास सावंत ह्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे ” आमचा एकच ध्यास , दक्षिण मुंबईचा विकास.” असे महत्त्वपूर्ण विधान केले आहे.