pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

शिवसेना सचिवपदी डॉ. संजय लाखे पाटील यांची नियुक्ती

0 3 2 3 8 3
जालना/प्रतिनिधी,दि.26
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना सचिवपदी डॉ. संजय लाखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. संजय लाखे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधले होते. त्यावेळी त्यांना पक्षात कुठलेही पद देण्यात आलेले नव्हते. परंतु काही संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. त्यांच्या संघटनात्मक कौशल्याचा व राजकीय अनुभवाचा फायदा व्हावा व त्यांना पक्ष संघटनेत सर्वार्थाने सक्रीय करण्यासाठी सचिवपद देण्यात आल्याचे समजते. विद्यार्थी दशेपासून काँग्रेसमध्ये विद्यार्थी काँग्रेस, युवक काँग्रेस, जिल्हा काँग्रेस, प्रदेश काँग्रेस आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीमध्ये विविध पदांवर व जबाबदाऱ्यांवर त्यांनी देशभर संघटनेत काम केले असून दहा – पंधरा वर्षांपासून पक्ष प्रवक्ते म्हणूनही अतिशय जबाबदारीने काम केले आहे. डॉ. लाखे पाटील हे अभ्यासू व्यक्तिमत्व असून, मराठा आरक्षण, आपत्ती व्यवस्थापन, दुष्काळ निवारण, सिंचन हे विषय त्यांचे अभ्यासक्षेत्र आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या वैविध्यपूर्ण अभ्यासाचा शिवसेनेसह महाविकास आघाडीला निश्चितपणे फायदा होऊ शकतो. या दृष्टीकोनातून या नियुक्तीकडे बघितले जात आहे. शिवसेनेत सचिव या अतिशय महत्त्वाच्या पदावर निवडले गेलेले ते ग्रामीण भागातील व मराठवाड्यातील पहिलेच पदाधिकारी आहेत. ग्रामीण भागात शिवसेना अधिक दृढ करण्यासाठी डॉ. लाखे पाटील साह्यभूत ठरणार आहेत.
या निवडीबद्दल व नियुक्ती बद्दल त्यांनी पक्षप्रमुख ऊध्दव ठाकरे आणि सौ. रश्मीताई ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, खा. संजय राऊत, आ. मिलिंद नार्वेकर, खा. अनिल देसाई, सुभाष देसाई, दिवाकर रावते, आ. अनिल परब, विनायक राऊत, आ. भास्कर जाधव, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खा. चंद्रकांत खैरे, श्रीमती सूष्माताई अंधारे, आ. सुनिल प्रभू, खा. अरविंद सावंत, विभागीय समन्वयक विश्वनाथ नेरूरकर, माजी आ. विनोद घोसाळकर, खा. ओमराजे निंबाळकर, खा. बंडू जाधव, आ. कैलास पाटील, प्रविण पंडित, अशोक पटवर्धन, माजी आ. किशनचंद तनवाणी, माजी आ. शिवाजीराव चोथे, लक्ष्मण वडले, श्रीमती ज्योतीताई ठाकरे आदिंसह पक्ष संघटनेच्या नेत्यांचे, शिवसैनिकांचे त्यांनी आभार मानले आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 3 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे