pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

युवा संघटना सोनारी आयोजित गडकिल्ले व रांगोळी स्पर्धेला उत्तम प्रतिसाद

गडकिल्ले स्पर्धेत प्रथम क्रमांक आई मातोश्री ग्रुप सोनारी, रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक काशिश कडू

0 3 2 3 7 9

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.8

महाराष्ट्राचे इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गडकिल्यांची सर्वांना ओळख व्हावी, गडकिल्लेच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास सर्वांना ज्ञात व्हावा, गड किल्ल्यांचे जतन व्हावे, संरक्षण संवर्धन व्हावे या दृष्टीकोणातून गड किल्ले स्पर्धाचे तसेच रांगोळी कलेविषयी जनजागृती व्हावी, नवनवीन कलाकार तयार व्हावेत. हे कलाकार राष्ट्रीय पातळीवर चमकावेत या दृष्टीकोणातून रांगोळी स्पर्धेचे आयोजन युवा संघटना सोनारीच्या माध्यमातून श्री सिद्धिविनायक मंदिर, सोनारी, उरण तालुका येथे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेला जनतेचा, नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.

स्पर्धेतील विजेत्या उमेदवारांना बक्षीस, सन्मान चिन्हे, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सत्या कडू, राकेश नरेश कडू, कु. दिपक चिंतामण कडू, सुरेश कडू, कु. हितेश कडू, अंकुश तांडेल, प्रशांत कडू आदी मान्यवर उपस्थित होते.युवा संघटना सोनारी तर्फे आयोजित केलेल्या गडकिल्ले स्पर्धेत प्रथम क्रमांक आई मातोश्री ग्रुप सोनारी, द्वितीय क्रमांक लव्या म्हात्रे, कृपा म्हात्रे मनन म्हात्रे यांनी तर तृतीय क्रमांक जय शिवराय ग्रुप सोनारी यांनी पटकविला.तसेच रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक काशिश कडू, द्वितीय क्रमांक स्मिता भोईर, तृतीय क्रमांक वांशिका तांडेल यांनी पटकाविले. सदर कार्यक्रमासाठी युवा संघटना सोनारी व राकेश कडू मित्र परिवाराच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. युवा संघटना सोनारी यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून समाजामध्ये एक संदेश देखील दिलेला आहे आपली संस्कृती परंपरा गड किल्ले त्यांचा इतिहास यांची माहिती व त्यांचा जतन संवर्धन येणाऱ्या पिढी कडून व्हावे हाच स्पर्धेच्या माध्यमातून संदेश देण्यात आला.युवा संघटना सोनारी यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला जनतेचाही उत्तम प्रतिसाद लाभला. स्पर्धकांनी, नागरिकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 3 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे