0
3
1
1
2
6

जालना/प्रतिनिधी,दि.30
गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरात महिला, बालक,
युवक युवती अशा समाजातील अबालवृद्ध व विविध घटकांच्या कलागुणांना वाव देणार्या विविध स्पर्धांचे आयोजन करून सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव
साजरा करणे काळाची गरज असून त्यासाठी गणेश महासंघाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी केला.
शहरातील संभाजीनगर प्रभागातील शांतिनिकेतन विद्यामंदिर या शाळेत गणेश महासंघाच्या अध्यक्षपदी अशोक पांगारकर, गणेश फेस्टिवलच्या अध्यक्षपदी
राजेंद्र गोरे, मराठवाडा चेंबर्स ऑफ कॉमर्स अध्यक्षपदी संजय दाड,ग्रामसेवक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी जी.बी. काळे सरचिटणीसपदी पी.एस.वाघ, तालुकाअध्यक्षपदी आर.यु.गोरे, सचिवपदी महेश वझरकर यांची निवड
झाल्याबद्दल जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर उद्योजक महेंद्र देशपांडे, संजय राऊत, शरद देशमुख, प्रा.राजेंद्र भोसले आदींची उपस्थिती
होती.पुढे बोलताना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले की, गणेशोत्सव हा अत्यंत मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा सर्वात मोठा उत्सव आहे.
त्यानिमित्त खूप मोठ्या प्रमाणावर गणेश मंडळ गणेशाची प्रतिष्ठापना करतात.या गणेशोत्सवाच्या निमित्ताने जर समाजातील महिला पुरुष युवक बालक यांच्या
विविध कलागुणांना वाव देणार्या व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा होणारे उपक्रम राबविल्यास खर्या अर्थाने गणेशोत्सवाचा फायदा लोकांना होईल. करिता या पद्धतीने गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी गणेश फेस्टिवल व गणेश महासंघाने पुढाकार घेऊन गणेश मंडळांना प्रोत्साहित
करावे. असे केल्यास समाजातील अनेक नागरीकांना याचा फायदा होईल आणि अशा प्रकारचे कार्यक्रम राबविणे खर्या अर्थाने आज काळाची गरज असल्याचे
अंबेकर यावेळी म्हणाले.जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी या कार्यक्रमात या सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांचा यथोचित गौरव करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा
दिल्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिवसेनेचे शहरप्रमुख बाला परदेशी यांनी केले तर आभार शहर प्रमुख दुर्गेश काठोटीवाले यांनी केले. सत्काराला उत्तर देताना गणेश महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अशोक पांगारकर म्हणाले की,यावर्षी गणेश महासंघाच्या वतीने सामाजिक उपक्रम व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यावर भर दिला जाईल, त्याचप्रमाणे सामाजिक एकोपा वाढावा यासाठी
प्रयत्न केले जातील, असे म्हणाले.तर मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल
झालेल्या सत्काराच्या निमित्ताने सत्कारास उत्तर देताना संजय दाड म्हणाले की,मराठवाडा चेंबर्स ऑफ कॉमर्स ही व्यापार्यांसाठी काम करणारी महत्वाची संघटना आहे. या संघटनेच्या अध्यक्षपदी मला काम करण्याची संधी मिळत असल्याचे मिळत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करून माझ्या अध्यक्षपदाच्या काळात मी व्यापारी व समाजासाठी काम करणार असल्यास ते
म्हणाले. या कार्यक्रम प्रसंगी बोलताना गणेश फेस्टिवलचे अध्यक्ष राजेंद्र गोरे म्हणाले की, जालना शहरांमध्ये गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून खूप चांगल्या कार्यक्रमाची मेजवानी दरवर्षी जालनेकरांसाठी साठी आयोजित केली
जाते. यावर्षी गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून चांगले व समाजाला दिशा देणारे कार्यक्रम राबविणार असल्याचे सांगीतले.या कार्यक्रम प्रसंगी बाबासाहेब पाखरे, जीवन खंडागळे, सदाशिव वाघमारे,पांडुरंग काळे, रमेश सेठी, बबनराव काजळे, अनिल अंभोरे, विजय शेंदरकर,
अशोक आघाव, गोरख खैरे, कुलकर्णी, विनोद निर्मल आदींची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
0
3
1
1
2
6