pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

खाजगी जागेतील होर्डिंग मुळे अपघाताला निमंत्रण

मृत्यू होण्याची शक्यता. ● प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

0 3 2 3 7 9

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.18

मुंबई होर्डिंग दुर्घटनेची घटनेला काही वर्षे झाले असतानाच आता मुंबई पासून जवळ असणारे शहर म्हणजे उरण. या उरण तालुक्यातील विविध भागात औद्योगिकीकरण वाढले आहे यामुळे येथील शेतीला सोन्याचे भाव आले आहेत पण या औडोगिकीकरणाचे जाहिरात करणारे मोठं मोठे होर्डिंग खाजगी जागेत लागलेले दिसतात यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. याकडे वेळीच प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र प्रशासनाच्या दुर्लपणामुळे अनेक अपघात होत आहेत.अशीच एक घटना उरण तालुक्यातील वशेणी गावात दिनांक १२ मे रोजी घडली आहे.शेतामध्ये लावलेले अनधिकृत होर्डिंग पडून ३ गुरांना जखमा झाल्याची माहिती ग्रा.प.सदस्य संग्राम पाटील यांनी दिली आहे.हे सर्व अनधिकृत होर्डिंग लवकरात लवकर काढावे अशी विनंती प्रशासनाला करणार असून हे होर्डिंग न काढल्यास स्वतःहुन ते होडिंग काढण्यात येतील अशी सूचना संग्राम पाटील यांनी प्रशासनाला दिली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 3 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे