भगवान धनगे यांना शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याने पत्रकार व कवी यांच्याकडून अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त.

पुणे/आत्माराम ढेकळे,दि.4
पुणेः- शैक्षणिक क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा व मानाचा समजला जाणारा “नॕशनल एज्युकेशन ब्रिलायन्स अवाॕर्ड 2023″हा पुरस्कार नुकताच भगवान धनगे यांना दिल्ली येथे प्रदान करण्यात आल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
जालना जिल्ह्यातील ‘शरद शिक्षण व संशोधन संस्था’जालना संचलित “प्रतिभा माध्यमिक विद्यालय”,काजळा या शाळेत भगवान धनगे गेल्या २७वर्षापासुन कार्यरत आहेत.(NEBA)2023,जयपुर यांच्यातर्फे दिला जाणारा शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षण पुरस्कार आहे.’राष्ट्रीय शिक्षण ब्रिलायन्स अवाॕर्ड्स 2023’हा पुरस्कार त्यांना शैक्षणिक क्षेत्राच्या सुधारणेसाठी ,योगदानाबद्दल आणि प्रयत्नांची प्रशंसा करत त्यांच्यावर विश्वास ठेवत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला आहे.हा महत्वाचा “नॕशनल एज्युकेशन ब्रिलायन्स अॕवार्ड 2023″पुरस्कार नवी दिल्ली येथील पंचतारांकित ‘वेलकम’हाॕटेल येथे एका कार्यक्रमात कॕबिनेट शिक्षण मंत्री राजकुमार आनंद ,माजी संसद सदस्य संतोष बागरोडिया,माजी कोळसा मंत्री तसेच NEBAचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम गौरव या मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
शिक्षण क्षेत्रातील भगवान धनगे यांचे प्रशंसनीय कार्य तसेच पत्रकारितेच्या माध्यमातून देखील सामाजिक उत्कृष्ट कार्य आहे.तसेच समाजात सर्व स्तरात त्यांचा संपर्क आहे.त्यांच्या या कार्याच्या आढाव्यानुसार त्यांना मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या कार्याची पावती आहे.असे पुणे येथील वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत प्रसिद्ध मुक्त पत्रकार आत्माराम ढेकळे व सामाजिक कार्यकर्ते व प्रसिध्द कवि दत्तात्रय वडगावकर यांनी व्यक्त करुन त्यांचे अभिनंदन केले आहे.व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देखील दिल्या आहेत.