राजुरेश्वर माध्य व उच्च माध्य विद्यालय नानेगाव येथील श्रद्धा दिनेश शिनगारे राज्य स्तरीय (स्टेट लेवल ) निवड…

बदनापूर/प्रतिनिधी, दि 22
शालेय क्रीडा स्पर्धा विभाग स्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धा 2024-25 राजुरेश्वर माध्य व उच्च माध्य विद्यालय नानेगाव ता बदनापूर विद्यालयातील इ अकरावी विज्ञान विद्यार्थिनी कु श्रद्धा दिनेश शिनगारे हिने 21 ऑक्टोबर 2024 सोमवार या दिवशी विभागीय क्रीडा संकुल गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या विभाग स्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धे मध्ये वयोगट 17 वाजनगट 59 मध्ये स्नॅच 40kg, आणि क्लीन अँड जर्क 50 kg एकूण 90 kg वजन उचलून राज्य स्तरीय (स्टेट लेवल ) ला पात्र झाली आहे.या निमित्ताने संस्थेचे सचिव डॉ राहुल पाटील डोंगरे, श्री.पांडुरंग डोंगरे, विद्यालयाचे प्राचार्य पाटील सर, क्रीडा शिक्षक ढोले सर, पेटारे सर श्रीमती सुकेशनी दिनेश शिनगारे( पालक )गावातील सरपंच, उपसरपंच, पंचक्रोशीतील सर्व गावकरी, प्राध्यापक,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांनी तिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.