श्री.चक्रधर स्वामी माध्य. व उच्च माध्य. विद्यालय हिस्वन (खु.) येथे जिल्हास्तरीय शुटिंग व्हालीबॉल स्पर्धेचे आयोजन

जालना/प्रतिनिधी, दि.22
क्रीडा व युवक संचनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी जालना व श्री. चक्रधर स्वामी माध्य. व उच्च माध्य. विद्यालय हिस्वन खु. ता. जि. जालना यांच्या संयुक्त विदयमाने आज ( दि.22) रोजी जिल्हास्तरीय शुटिंग व्हालीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री टिपरास सर,पर्यवेक्षक गिते सर,जेष्ठ शिक्षक श्री. रुद्राक्ष सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी वाबळे साहेब, राष्ट्रीय पंच तुल्ले सर, कोच यासिन सर, अरीफ सर, शाळेचे शिक्षक म्हस्के सर, क्रीडा शिक्षक शिंदे सर, वायाळ सर, खोतकर सर, तळेकर सर, मिंधर सर, खरात मॅडम व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते…कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब गिते सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री रुद्राक्ष सर यांनी केले…