विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जालना/प्रतिनिधी,दि.28
माहेराहून व्यवसाय करण्यासाठी १० लाख रुपये घेऊन येण्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ करणाऱ्या तसेंच बेकायदेशीर दुसरा विवाह करून पत्नीचा छळ करणाऱ्या सासरच्या बारा जणांविरुद्ध वेदांत नगर पोलीस ठाणे संभाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची माहिती अशी की, अनुसया संदीप वैद्य रा. पुष्कराज अपार्टमेंट, भानुदासराव चव्हाण सभागृहाजवळ रेल्वे स्टेशन रोड संभाजीनगर यांनी वेदांत नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, त्यांचा विवाह १५ मे २०१० रोजी जाफ्राबाद येथील संदीप हरिभाऊ वैद्य यांच्यासोबत जैस्वाल मंगल कार्यालय, कोकणवाडी चौक छत्रपती संभाजीनगर येथे झाला. लग्नानंतर काही दिवस मला चांगली वागणूक दिली. वर्षभरानंतर तिला सासरच्या मंडळीकडून त्रास देणे सुरू झाले पती संदीप हरिभाऊ वैद्य, सासरा हरिभाऊ, सासू हौसाबाई, दीर राजेंद्र, जाऊ मीनाक्षी, नणंद संगिता अदबने, तिचा पती देविदास अदबने, सोनू गायकवाड, तिचा पती अशोक गायकवाड, कौशल्या गायकवाड, शुभम गायकवाड, प्रकाश एकनाथ दिवटे सर्व राहणार जाफ्राबाद, यांनी वेळोवेळी अनुसया हिचा मानसिक व शारीरिक छळ केला. त्यामुळे अनुसया वैद्य हिने वेदांत नगर पोलीस ठाणे संभाजीनगर येथे पती सह बारा जणांविरुद्ध वेदांतनगर पोलीस ठाण्यात ४९४, ४९८ अ ३२३,५०४,५०६,३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.