ब्रेकिंग
राष्ट्रीय युवा सप्ताहाचे शांतीनिकेतन विद्यालयात उत्साहात उद्घाटन संपन्न
0
3
1
0
6
7
जालना/प्रतिनिधी,दि.12
क्रीडा व युवक सेवा संचालनालय ,महाराषट्र राज्य़, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जालना ,नेहरू युवा केंद्र,जालना व जालना पिथीयन कौन्सिल व शांती निकेतन विद्यालय,संभाजी नगर,जालना यांच्या सहकार्याने आज दि.12/01/2024 रोजी राष्ट्रीय युवा दिन व युवा स्प्ताहाच्या कार्यक्रमांचे उद्घाटन सकाळी 10.00 वाजता शांतीनिकेतन विद्यालय,संभाजी नगर,जालना येथे प्रारंभी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. युवकांनी स्वामी विवेकानंदाचा आदर्श घेऊन कार्य कारावे तसेच राजमाता जिजाऊ यांचे संस्कार तसेच त्यांची शिकवन आजच्या युवा पिढीने आत्म़सात करायला पाहिजे याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्य़क्ष जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी प्रतिपादन केले .
याप्रसंगी डॉ.रेखा परदेशी , क्रीडा प्रशिक्षक श्रीमती.क्षितीजा गव्हाणे, स्वामी विवेकानंद यांचे तत्वज्ञान व शिकवण ,कार्य प्रेरणादायी विचारावर व्याख्यान दिले. श्री.धनंजय पाटील यांनी दिले. श्री. शेख चाँद पी.जे.,शाळेचे मुख्याध्यापक श्री.ज्ञानेश्वर गाढवे,मुख्याध्यापिका श्रीमती.प्रेमला जाधव, श्री.मिलींद सावंत,श्री.जयपाल राठोड, श्री.अशेाक महाले,श्री.आंबादास घायाळ,श्री.संजय खरात ,श्री.अमोल पवार,श्री.शिवहरी मांटे ,श्री.सीमा इंगळे,श्री.पांडुरंग वाजे,श्रीमती . स्वाती काकडे,श्रीमती.गायत्री सूर्यवंशी,श्रीमती.अरुणा मांटे, श्री.हारुण खान,श्री.राहूल गायके इत्यादींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत बेले यांनी केले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा परिधान करून भाषणे केली. सदर प्रसंगी विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.दि.12 ते 19 जानेवारी 2024 दरम्यान आयोजित युवा दिन व युवा सप्ताहाच्या विविध स्पर्धा तसेच विविध उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.अरविंद विद्यागर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.रेखा परदेशी यांनी केले.
0
3
1
0
6
7