बीडकडील अवजड वाहनांच्या मार्गात बदल
जालना/प्रतिनिधी,दि. 7
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 ची कलम 36 अन्वये जालनाकडुन अंबडमार्गे बीडकडे जाणाऱ्या व येणाऱ्या अवजड वाहनांना दि. 7 ऑक्टोबर 2024 रोजी 4 वाजेपासून ते दि. 9 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत कालावधीत वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. तसेच वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे, असे आदेश पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी जारी केले आहेत.
बीडकडून अंबडमार्गे जालनाकडे येणारी अवजड वाहने ही शहागड, हरीओम हॉटेल वडीगोद्री समोरील उड्डाणपुलाचे खालुन, पाचोड, अंबड, गोलापांगरीमार्गे जालनाकडे जातील. तसेच जालनाकडुन अंबडमार्गे बीडकडे जाणारी अवजड वाहने ही याच पर्यायी मार्गाचा अवलंब करतील.
घनसावंगीकडुन अंबडमार्गे जालनाकडे जाणारी अवजड वाहने ही सुतगिरणी चौफुली घनसावंगी, गुरुपिंपरी, राणी उंचेगाव, राणी उंचेगाव फाटा, अंबड येथील महालक्ष्मी पेट्रोल पंपा समोरुन, गोलापांगरी मार्गे जालनाकडे जातील. जालनाकडून अंबडमार्गे घनसावंगीकडे जाणारी अवजड वाहनेही याच पर्यायी मार्गाचा अवलंब करतील.
घनसावंगीकडून अंबडमार्गे शहागडकडे जाणारी अवजड वाहने ही सुतगिरणी चौफुली घनसावंगी, तिर्थपुरी, सुखापुरी, सुखापुरी फाटा, वडीगोद्रीमार्गे शहागडकडे जातील. शहागडकडून अंबडमार्गे घनसावंगीकडे जाणारी वाहने याच पर्यायी मार्गाचा अवलंब करतील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.