अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकर्यांना आर्थिक मदत द्या – गजानन ढाकणे
जालना/प्रतिनिधी,दि.29
जालना जिलह्यातील रविवार पासून जालना जिलह्यातील खुप मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे त्यामुळे शेतकर्यांचा रब्बी हंगाम हा पाण्यात बुडाला आहे व शेतकर्यांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी हा चिंताग्रस्त झालेला आहे दरम्यान शासनाने त्वरित नुकसान ग्रस्त पिकाचे पंचनामे करून शेतकर्यांना आर्थिक मदत देण्यात यावी तसेच जालना तालुक्यातील सेवली मंडळामध्ये खुप मोठ्या प्रमाणात पाऊस व गारपीट झालेली आहे त्यामध्ये ज्वारी,गहु,कापूस,हरभरा,कांदा इत्यादी पिकांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यामुळे शेतकर्यांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे तरीही शासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकर्यांना भरपाई करून देण्यात यावी अशी मागणी जालना तालुक्यातील सोनदेव धाराचे सरपंच गजानन ढाकणे यांनी मा ना कृषि मंत्री धनंजय मुंडे साहेबांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे