राष्ट्रीय नारीशक्ती महिला संघटनातर्फे हळदी कुंकू उत्साहात संपन्न.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.22
महिलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या व सर्वच क्षेत्रात अग्रेसर असलेल्या राष्ट्रीय नारिशक्ती महिला संघटनेतर्फे मौजे रोडपाली नवी मुंबई येथे हळदी कुंकूचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात मनमोहन यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की राष्ट्रीय नारीशक्ती महिला संघटना अध्यक्ष आरती बेहरा या महिलांच्या विकासासाठी 24 तास काम करित आहेत. भारताचे गुजरात राज्य सोडून सर्व राज्यात महिला विकासाचे काम चालू आहे. सर्व मिळून 8 लाख 75 हजार जनसंख्या राष्ट्रीय नारिशक्ती महिला संघटनेमध्ये काम करीत आहेत.अनेक तरुणीचे पलायन झाले आहेत.त्या मानवी तस्करी करणाऱ्या लोकांच्या कैदीत अडकलेल्या महिला व युवती यांची सुटका करून त्यांच्या घरी नेणे, विधवा महिलांना पेन्शन मिळवून देणे, महिलांना मारणाऱ्या दारुड्या, नशेडी आणि जुगारी पतीच्या विरोधात आवाज उठविणे.विखुरलेल्या परिवाराला एकत्र (आनंदी )करणे, त्यांना सुधारण्याचे काम संघटनेच्या अध्यक्ष आरती बेहरा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. आरती बेहरा यांच्या अशा महत्वाच्या योगदानामुळेच सर्व महिलांना त्यांच्या बददल आदरपूर्वक सन्मान आहे. असे मत व्यक्त करत मनमोहन महाराज यांनी नारी वाचवा देश वाचवा, नारी वाचवा नारीला शिकवा , नारीचा सन्मान करा, नारीशक्ती संघटनेमध्ये सामील व्हा असे आवाहन महिलांना केले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय नारी शक्ती संघटनेचे नॅशनल सेक्रेटरी डी. पी. सोनावणे,महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष – राजेंद्र घरत,महिला अध्यक्ष मंदाताई वानखेडे,ऑल इंडिया रिक्षा विभागाचे – भारती श्रीराम ,मुख्य मिडीया प्रभारी-मनमोहन महाराज ,झूगी झोपडी विभागाचे महासचिव पूजा पाटील,सुनिता सोनावणे आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात महिलांच्या विविध समस्या, हक्क व अधिकार याबाबतीत मार्गदर्शन करण्यात आले. मंदाताई यांनीही उपस्थितांना यावेळी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात गौतम जानू पाटील, चांगुबाई विठ्ठल पाटील, प्राची रविंद्र पाटील, आशा दिलीप जाधव, रमाबाई गौतम पाटील, ताराबाई रामदास शिवकर, वनिता राम कोटियन, आशा कांबळे, हेमांगी गुजराना या सर्व ज्येष्ठ मान्यवरांना पुष्पगुच्छ देवून त्यांचा मनः पुर्वक सत्कार करण्यात आला.सभेचा समारोप हा राष्ट्रीय नारीशक्तीच्या महिलांनी केक कापून आनंदाने साजरा केला. सर्व महिलांना गुलाबाचे पुष्प व हळदीकुंकू गिफ्ट देवून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. तसेच गावांतील ज्येष्ठ व श्रेष्ठ महिला/पुरुष यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमा दरम्यान आरती बेहरा यांनी व्हिडिओ कॉल करुन उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि सर्वांना तीळ गूळ घ्या. गोड गोड बोला असे शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पुजा पाटील यांनी केले.तर भारती श्रीराम यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.राष्ट्रगीत झाल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली.