स्व. अन्नपुर्णा विनायक भातडे यांचे 99 व्या वर्षी निधन !

मुंबई/प्रतिनिधी, दि.2
गाव दुर्गवाडी ,कशेळी, तालुका राजापुर, जिल्हा रत्नागिरी येथील रहिवासी .श्रीमती अन्नपुर्णा विनायक भातडे यांचे आज (दि.2) रोजी निधन झाले आहे,मृत्यूसमयी त्यांचे वय 99 वर्ष इतके होते.
श्रीमती स्व.अन्नपुर्णा विनायक भातडे ह्या प्रथम गिरगावात रहात असताना त्यांना पुष्कळ जणांना खाऊ पिऊ घातले .प्रत्येकाच्या प्रसंगात धाऊन जात त्यांचे सांत्वन करत व त्यांना सढळ हाताने अन्नाची मदत करत .त्यांच्या घरी कोणीही पाहुणे ,नातेवाईक आले तर त्या त्यांना जेवण वाढल्याशिवाय परत पाठवत नसत.आपल्या कुटुंबीयांवर त्यांची खुप माया होती .अन्नदान हेच सर्वात श्रेष्ठ दान आहे असे त्या नेहमी म्हणत असत.वयाच्या ९९ व्या वर्षी त्यांनी नवीन घरात म्हणजेच कल्याण येथे दिनांक ०२/१०/२०२३ रोजी दुपारी १२:०० च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला व ईहवासातला प्रवास त्यांचा संपला .त्यांच्यानंतर त्यांची मुलगी श्रीमती स्मिता प्रभाकर कुंडईकर व त्यांचा नातू भुषण प्रभाकर कुंडईकर व नात सौ.सारिका उमेश हटकर व नात जावई श्री. उमेश वसंत हटकर व नातवंडे कुमारी ध्रुवाला उमेश हटकर व कुमार भव्य उमेश हटकर असा परिवार आहे. त्यांच्या पवित्र आत्म्यास सदगति देवो व त्यांच्या कुटुंबीयांस या दु:खातून सावरण्याची ताकद देवो हिच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना