पोलीस दलातील कर्तव्य पालन करत माणूसपण जपणारे आदर्श व्यक्तिमत्व:रामेश्वर मुळक

अनिल भालेकर/अंबड,दि.24
धावपळीच्या जीवनशैलीमध्ये जो तो भौतिक सुखाच्या मागे धावत आहे.आणि या धकाधकीच्या जीवन प्रवासात माणूस पण हरवत जात असल्याचे दिसून येते. आपण या समाजाचे, या भूमीचे,या देशाचे देणे लागतो ही आदर्श विचारसरणी कमी प्रमाणात अंगीकारणारे व त्यानुसार कृती करणारे लोक माणूस पण टिकवत आहे हीच काय ती समाधानाची बाब ठरते.
“जन्मलो त्या मातीला आपलं काही देणं आहे, हक्क आणि ईमानाची मूठभर माती घेणं आहे..!”
याच आदर्श विचाराने अविरत सत्कर्म करणारे, प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व म्हणून रामेश्वर मुळक अंबड शहरा बरोबरच पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत.महाराष्ट्र पोलीस दलामध्ये गुप्त वार्ता विभागात कार्यरत असणारे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून तर त्यांची ओळख आहेच परंतु प्रेरणादायी, प्रभावी वक्ते म्हणून रामेश्वर मुळक प्रसिद्ध आहेत.वाचनाचा छंद जोपासत आपल्या अभ्यासू वृत्तीने अनुभवाची सांगड घालत विद्यार्थ्यांना जीवनामध्ये गरुड झेप घेण्यास प्रेरणादायी मोफत मार्गदर्शन करत असतात.
आपल्या शब्द भंडारातून प्रसंग रूप उदाहरणे देत विद्यार्थ्यांना कधी हसवतात तर कधी काळजाला हात घालणाऱ्या शब्दाने डोळ्यातील अश्रूंना बाहेर येण्यास भाग पाडतात.
पोलीस दलातील कर्तव्यदक्ष पने कार्य करण्याबरोबरच माणूस पण जपणारे रामेश्वर मुळक यांचे सर्वांशीच सलोख्याचे व जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले आहे. विद्यार्थ्यांमध्ये विशेष लोकप्रिय असणारे रामेश्वर मुळक यांनी आपल्या मुलाच्या बाविसाव्या वाढदिवसानिमित्त पाचशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.
अंबड शहरातील सावित्रीबाई फुले विद्यालय, जाबुवंत विद्यालय, जिल्हा परिषद शाळा रोहिलागड, पोलीस भरती प्रशिक्षण अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना अमूल्य, प्रेरणादायी मार्गदर्शन करण्याबरोबरच शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. याप्रसंगी दै.बदलता महाराष्ट्राचे अनिल भालेकर, मुख्याध्यापक कुलकर्णी एस बी,मनोहर पटेकर, निंबाळकर डब्ल्यू ए, भद्रे ए.एन, धनवे पी.एस, किशोर रहाटगावकर शिक्षक वृंद तसेच शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.