जालना : लायन्स क्लब ऑफ जालना च्या वतीने सोमवारी सायंकाळी सात ते दहा दरम्यान बडी सडक येथील लायन प्रमोद रुणवाल यांच्या घरासमोर माखनवडाचे प्रसाद गणेश भक्तासाठी वाटप करण्यात येणार आहे. इंदोर येथील माखनवडा बनवण्यात निपुण असणारे खास कारागिराकडून बनवलेले चांगल्या तुपातील माखनवडे जालना शहरात प्रथमच वाटप होणार आहे. तरी गणेश भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन लायन्स क्लब ऑफ जालनाच्या या प्रसाद वाटप कार्यक्रमाचे प्रकल्प प्रमुख ला. विजय दाड, ला. श्याम लोया, ला. प्रमोद रुणवाल,ला. बालाप्रसादजी भक्कड, ला. पुरुषोत्तम जयपुरिया व क्लब च्या अध्यक्षा ला. जयश्री लड्डा, सचिवा ला. मंजू श्रीमाळी व कोषाध्यक्षा ला. कल्पना बियाणी व समस्त लायन्स क्लब ऑफ जालना च्या वतीने करण्यात आले आहे . परतुर येथील दृष्टिलायन्स नेत्रालय, जालना येथे आर्थोपेडिक बँक, दंत चिकित्सा व नेत्र तपासणी चे फिरते रुग्णालय, स्वर्ग रथ व लायन्स गार्डन इत्यादी प्रकल्प लायन्स क्लब ऑफ जालना व परिवाराच्या वतीने कार्यान्वित करण्यात आलेले आहे त्याचा लाभ हजारो गरजवंत घेत आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा