ब्रेकिंग
जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांचे हस्ते महारेशीम अभियानाची सुरुवात

0
3
2
1
8
2
जालना/प्रतिनिधी, दि.17
सन 2025-26 मध्ये तुती लागवड समुहात मनरेगा, सिल्क समग्र-2 योजने अंतर्गत तसेच वैयक्तीक नविन तुती लागवड करण्यासाठी उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी दि. 9 जानेवारी ते 9 फेब्रुवारी, 2025 या कालावधीत जिल्ह्यात महा-रेशीम अभियान 2025 राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात महारेशीम अभियान 2025 च्या रथास जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांचे हस्ते आज (दि.17) रोजी हिरवी झेंडी दाखवुन सुरुवात करण्यात आली.
यावेळी रेशीम विकास अधिकारी श्री. मोहिते यांच्यासह शेतकरी बांधव आणि इतर अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.
0
3
2
1
8
2