श्रीराम नवमी निमित्त श्री केशवराज संस्थान केशव शिवणी येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

जालना/प्रतिनिधी, दि.7
श्रीराम नवमी निमित्त श्री केशवराज संस्थान केशव शिवणी येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली या नाम सप्ताह मध्ये सकाळी १० ते १२ या वेळेत हरिभक्त परायण रमेश महाराज जायभाये श्रीक्षेत्र वैष्णव गड यांचे राम जन्माचे कीर्तन झाले .तसेच १२.३० ते २.३० हरिभक्त परायण प्रेमानंद महाराज देशमुख माऊली वारकरी शिक्षण संस्था पांगरी फाटा यांचे काल्याचे किर्तन झाले .या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर या सप्ताहास भेट देण्यासाठी आले ,यामध्ये परमपूज्य श्री श्री श्री १००८ दत्तात्रेय महाराज दहिवाळ श्री दत्तपीठ लाडगाव यांचे आगमन झाले .सिंदखेडा राजा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय मनोजभाऊ कायंदे माजी आमदार शशिकांतजी खेडेकर साहेब माजी आमदार तोतारामजी कायंदे .केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब यांचे पुतणे युवा नेते योगेशजी जाधव भाजपा प्रवक्ते विनोद भाऊ वाघ परळी येथील उद्योजक सुरेश आण्णा टाक परळी येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सूर्यप्रकाशजी उदावंतजी नगरसेवक जालना ,उपविभागीय अधिकारी संजयजी खडसे सिंदखेडराजा हभप ज्ञानेश्वर महाराज झगरे गुरूजी वाकदकर साहेबराव महाराज काटे शिवसेना नेते वैभवजी देशमुख सर माजी नगराध्यक्ष संतोष भाऊ खांडेभराड सामाजिक कार्यकर्ते शंकररावजी उगलमुगले सर जागदरी , जुनेद अली सभापती विलासरावजी देशमुख पं.स.सदष्य बारस्कर साहेब निवृत्ती वायाळ किनगाव राजा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी नरवडे साहेब व अन्य पोलीस कर्मचारी मंडळी तसेच कोंडूजी अडाणे सराफ रिसोड नामदेवराव टेहरे सराफ बुलढाणा सुधाकरराव डहाळे सराफ पाथरी गजाननराव बेदरे औरंगाबाद प्रशांत कुलथे जालना प्रकाश बुराडे फुलंब्री अंबादास बुट्टे तसेच केशवराज संस्थानचे विश्वस्त वसंतराव उदावंत व सरपंच विकास आंधळे तसेच राजकीय, सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .व उपस्थित मान्यवरांचे हस्ते मंदिराचा अनावरण सोहळा श्रीक्षेत्र केशव शिवणी येथे पार पडला